कोल्हापूर प्रतिनिधी
प्रा. विश्वनाथ पाटील
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो.9975 978 073
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) / दिनांक :18 : शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून नवीन तीन अभ्यासक्रमांना मान्यता दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी दिली.
या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक :25 सप्टेंबर 2023 असल्याचे सांगून डॉ. विश्वनाथ पाटील पुढे म्हणाले, " ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रम, बालवाडी अभ्यासक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास अभ्यासक्रम हे आमच्या महाविद्यालयात मान्यता मिळालेले तीन अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान पात्रता दहावी उत्तीर्ण असली तरी जादा ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यासाठी कोणत्याही वयोगटातील कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. या प्रवेशासाठी वयाची किंवा परिसराची अट नाही. एकावेळी तिन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. "
श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील यांच्या प्रेरणेतून हे नवीन अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. अभ्यासक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे : - (1) ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रम : शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, कालावधी - 6 महिने, शैक्षणिक शुल्क 1000 रुपये. ( विभागप्रमुख - प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील.)
(2) बालवाडी शिक्षक शिक्षण : शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण, कालावधी - 6 महिने, शैक्षणिक शुल्क 1000 रुपये ( विभागप्रमुख - प्रा. गुलनास मुजावर)
(3) व्यक्तिमत्त्व विकास अभ्यासक्रम : शैक्षणिक पात्रता - किमान 10 वी उत्तीर्ण, कालावधी - 3 महिने, शैक्षणिक शुल्क - 500 रुपये ( विभागप्रमुख - प्रा. संजय गणपती जाधव)
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क :प्राचार्य, डॉ. विश्वनाथ पाटील, यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोडोली ( भ्रमणध्वनी क्रमांक - 9975978073)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा