अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी सप्ताह अंतर्गत हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रतिभा काॅलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज,चिंचवड-पुणे येथील डॉ.रवींद्र निरगुडे होते
याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या दैनंदिन वापराचे महत्व विशद केले.तसेच पत्रकारिता,सिनेमा,अध्यापन इत्यादी विविध क्षेत्रातील उपलब्ध संधींचे विस्ताराने विवेचन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड विशेष आमंत्रित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे हे सांगून वाचन,आचार,विचार इत्यादी बाबींमधून स्वतःचा विकास करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले भाषेच्या योग्य वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे होते त्यांनी सर्व भाषा महत्वाच्या असल्याचे सांगून भाषेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास करून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले
यावेळी हिंदी दिवसाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे निकाल वाचन प्रा. निवृत्ती लोखंडे यांनी केले ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. यामध्ये हितेष पुंज (प्रथम),वैष्णवी भोसले (द्वितीय), पार्वती मोरे (तृतीय) मोहिनी तुपे आणि भाग्यश्री माने-देशमुख (उत्तेजनार्थ) बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना हिंदी विभागाच्या वतीने बक्षीसे देण्यात आली याप्रसंगी कु.नंदिनी भालेराव हिने आपले मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ.अपर्णा कुचेकर, ज्युनिअर विभागाचे प्रा.बी.डी. काकुळे,डॉ.हनुमंत आवताडे,प्रा.दादासाहेब कोकाटे यांच्यासह हिंदी विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.श्रावणी माने हिने तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय आलकेश गेजगे करून दिला.आभार प्रदर्शन योगेश तुपे याने केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मोहिनी तुपे हिने केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे,सलीम शेख,आणि बी.ए.भाग १ च्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा