Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

महर्षी प्रशालेत पर्यावरण पूरक शाडू माती पासून "गणेश मूर्ती" बनवणे कार्यशाळा संपन्न

 


अकलुज ----प्रतिनिधी

शकुर --तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी

                         शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न :-D झाली. यावेळी विद्यार्थ्यांना जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले. "आमच्या पोरांनी गणपती बनवला " या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अगदी मनमुग्ध होऊन सहभाग घेतला .गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या हस्ते करण्यात आले. कलाशिक्षक धन्यकुमार साळवे यांनी शाडू माती पासून मूर्ती कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकांद्वारे दाखवले .प्लास्टर ऑफ पॅरिस पासून प्रदूषण कसे होते हे मुलांना पटवून दिले .



गणेशोत्सव हा उत्सव पर्यावरण पूरक, ध्वनी प्रदूषणरहित व जलप्रदूषण विरहित म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव यांनी व्यक्त केली.

 शाडू माती पासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

  प्रशालेतील सर्व बालचमूंनी मातीच्या सुगंधात रमून गणेश मूर्ती बनवण्याचा मनमुराद आनंद लुटला व गणपती रायाचे जंगी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा