मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यास मुस्लिम समाजाचा पाठिंबा हाजी इरशाद भाई
अकलूज----प्रतिनिधी
शकुर -- तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो;-9860 112 351
मराठा आरक्षण मागणी साठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ( ता. अंबड ) येथे लोकशाही व अहिंसक मार्गाने मराठा बांधव आंदोलन करीत होते. त्यांचेवर पोलीस प्रशासना कडून बेछूट पणे लाठीमार करण्यात आला असून अनेक आंदोलकांना जखमी करण्यात आले आहे.सदर आंदोलन असंवैधानिक व हिंसक मार्गाने दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज्याच्या वतीने होणाऱ्या आंदोलनास व बंद आंदोलनास समस्त मुस्लिम समाजा कडून जाहिर पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती समस्त मुस्लिम जमात, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी दिली आहे.
सदर आंदोलन संविधानिक व लोकशाही मार्गाने होत असताना सरकार कडून हिंसक मार्गाचा अवलंब करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून असा घृणास्पद प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही अशा इशारा हाजी इर्शादभाई यांनी दिला आहे. सदर प्रकार निंदनीय असून मुस्लिम समाज त्याचा निषेध करीत असून झालेल्या प्रकाराची उच्च स्तरीय चौकशी होऊन दोषींवर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत अशी मागणी राज्य सरकार कडे हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.
यावेळी मुस्लिम जमातीचे प्रदेश सचिव डॉ. अॅड. परवेज़ अशरफी, कोषाध्यक्ष मुफ्ती अलताफ, रुग्णमित्र नादिर खान, सुफी इस्लामिक बोर्ड चे जिल्हा अध्यक्ष समदभाई जमादार, सुफी शरफुद्दीन पटेल, सुफी शब्बीर चौगुले, पापाभाई आतार आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा