संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मंगरुळ ता.तुळजापूर येथील कु. श्रीनिवास भालचंद्र कोरेकर इयत्ता 7 वी जि.प. प्रशाला, मंगरुळ, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद.याने धाराशिव (उस्मानाबाद)चे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांला दिलेले आपुलकीचे,आणि उत्तरदायित्व समजुन केलेले मार्गदर्शन हे नक्कीच विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात उपयोगी येणार आहे.खासदारांनी पाठवलेले
"आभार -पञाचे वाचन शाळेतील शिक्षक "दत्ताञय घेवारे" यांनी विद्यार्थ्यां समोर वाचन करुन दाखवले ते पुढील प्रमाणे
आपण पाठवलेले भारतीय स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा पत्र मिळाले. वाचून आनंद झाला शालेय शिक्षण घेत असताना विविध शालेय उपक्रम राबविले जात असतात. आपण या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून सहभागी झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार !
शिक्षण घेत असताना सुसंस्कार, सांस्कृतिक जोपासना याच बरोबर मुल्य शिक्षण आत्मसात करुन शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करणे व आपल्या ध्येयाकडे अविरतपणे वाटचाल करणे गरजेचे असते याच बरोबर आपल्या पालकांन प्रति आदरभाव तसेच त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत बाळगून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता आपल्यात निर्माण करावी. सध्या स्पर्धेचे युग असून स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अभ्यासाबरोबरच प्रचंड कष्ट करण्याची गरज आहे.
धन्यवाद !
आपला
(ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा