Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

दि सासवड माळी शुगर फॕक्टरीच्या 90 व्या गळीत हंगामाचा बाॕयलरा अग्नी प्रदीपन संपन्न .

 


उपसंपादक---नुरजहाँ शेख.

टाइम्स 45 न्युज मराठी

                              माळीनगर साखर कारखान्याला इंदापूर,पंढरपूर व माढा तालुक्यातून जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होतो.तिथे मात्र यंदा उसाच्या २० टक्केच लागणी झालेल्या आहेत.बोअर,विहीरिंची तसेच जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे.त्यामुळे पाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे.पुढच्या वर्षी उसाच्या कमतरतेमुळे साखर कारखान्यांची बिकट परिस्थिती असणार आहे.त्यामुळे पुढच्या वर्षी उसाचे गाळप कमी होईल.कारखाने किती दिवस चालतील हे सांगणे कठीण असल्याचे मतं माळीनगर साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.



       येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर या साखर कारखान्याच्या ९० व्या गाळप हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन शुगरकेन सोसायटीचे व्हा.चेअरमन कपिल विजयराव भोंगळे व त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहलताई भोंगळे यांचे हस्ते आज शनिवारी सकाळी १०.३० वाजता विधिवत पूजा करून करण्यात आले.

               याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे,मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे,नूतन होलटाईम डायरेक्टर परेश राऊत,संचालक मोहन लांडे, विशाल जाधव,निळकंठ भोंगळे,निखिल कुदळे, शुगरकेनचे चेअरमन अमोल ताम्हाणे,संचालक जयवंत चौरे,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रकांत जगताप,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सचिव प्रकाश गिरमे, संचालक अजय गिरमे,डॉ. अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके,कल्पेश पांढरे,दिलीप इनामके, सभासद,अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.



          राजेंद्र गिरमे पुढे म्हणाले,राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या मंत्री समितीने जाहीर केलेला आहे,परंतु माळीनगर साखर कारखान्याच्या यंत्रांची सर्व कामे पूर्ण झालेली असल्याने कारखाना लवकर चालू करू शकतो.कारखान्यातील सर्व कामे कामगार व अधिकारी वर्गाने अत्यंत कमी काळात चांगली केलेली आहेत.यावर्षी उसाची खूप टंचाई आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उन्हाळ्यामुळे आणि आत्ता पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन जवळजवळ २० टक्क्यांनी कमी झालेले आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्र बरोबर देशातील उसाची परिस्थिती खूप बिकट राहणार आहे.रब्बी पिकांसाठी एक आवर्तन मिळत होते.परंतु शासनाच्या मंत्रिमंडळाने यावर्षी दोन आवर्तने देण्याचे जाहीर केले आहे.असे ही श्री.गिरमे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा