इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व जनतेसाठी असणारे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा जेव्हा लहान मुलांना दहा हजारांची खेळणी देतात व त्यांच्यामध्ये रमतात तेव्हा गप्पा मारत मुलांची मने जिंकतात. असा सुखद करणारा अनुभव लुमेवाडीतील (ता. इंदापूर) यात्रेत पाहायला मिळाला.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र सुफी संत हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपुरी बाबांच्या उरुसानिमित्त दर्शन घेतले. त्यानंतर लहान मुलांत रमत त्यांची आपुलकीने विचारपूस केली. उरुस पाहण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये माजी राज्यमंत्री भरणे एवढे रमले की त्यांनी विक्रीसाठी आलेली दहा हजारांची खेळणी उपस्थित सर्व मुलांना वाटली. त्यामुळे माजी राज्यमंत्र्यांनी मुलांची मने जिंकताना मामा पणाचा, आनंदाचा अनुभव दिला. त्यातून मामांचा स्वभाव सर्व उपस्थितांनी अनभुवला.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद भरणे यांनी विक्रेत्याकडून जवळपास दहा हजारांची सर्वच खेळणी विकत घेतली. यामुळे विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकला. तसेच, खेळणी मिळाल्याने बालचिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी सरपंच श्रीकांत बोडके, मोहंमद कैफ तांबोळी, मुजाहिद तांबोळी आदिंसह यात्रेतील भाविक चिमुकले सहभागी झाले होते.
फोटो - लुमेवाडी येथील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र जोधपूरी बाबांच्या उरूसानिमीत्त चिमुकल्यांना खेळणी वाटप करताना आमदार दत्तात्रय भरणे.
---------------------------
पत्रकारांनी बातम्यांचा दर्जा पाळायला हवा.
उत्तर द्याहटवा