मुख्य संपादक --हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
ऐन नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोमात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडले असून तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील सरपंच पती सिकंदर वाहेद बेगडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश मच्छिंद्र माळी, माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण, चांद नदाफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राम राम करून नळदुर्ग येथे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रीय काँग्रेस-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या नळदुर्ग येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक (भाऊ) जगदाळे व सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ माजीमंत्री, काँग्रेस विधीमंडळ पक्ष प्रतोद, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव अमित (भैय्या) विलासराव देशमुख, धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार - ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उमरगा-लोहारा विधानसभेचे आमदार . प्रविण स्वामी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, काँग्रेस पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे यांच्या उपस्थितमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव .अमित (भैय्या) विलासराव देशमुख, यांच्या हस्ते सभेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे याप्रसंगी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा