संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींच्या तारखा आज (दि.९) जाहीर झाल्या. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर, मध्यप्रदेश १७ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होईल. या पाचही राज्यांतील निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर होईल, अशी माहिती आज नवी दिल्ली येथील रंगभवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी दिली. निवडणूक आयुक्त (EC) अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल हेही यावेळी उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा