संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे जय विजय संस्थेची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. जय विजय शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये जय विजय शिक्षक संघ आणि जय विजय पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार,आदर्श शाळा पुरस्कार, शिक्षक रत्न जीवनगौरव पुरस्कार,गुणवंत विद्यार्थी सन्मान पुरस्कार आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी संस्थेच्या आणि शिक्षक संघाच्या कार्यक्रमाबद्दल गौरव उद्गार काढले. नजीकच्या काळात संस्थेची भव्य इमारत बांधकामाचे पूर्ण नियोजन व तयारी संस्थापक . सुभाष मिसाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडली त्यावर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी प्रशासकीय कामासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जय विजय शिक्षक संघास दिले.संस्था स्थापनेपासूनच्या अवघ्या 12 वर्षातच संस्थेची स्वतःची जागा खरेदी करून त्यावर भव्य इमारत बांधण्याचे कार्य निश्चितच कौस्तुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.असे मोठे कार्य संस्थेचा पारदर्शी कारभार आणि सभासदांचा दांडगा विश्वास संस्थेवर असल्याशिवाय घडूच शकत नाही असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष सुभाष मिसाळ चेअरमन . कविता शेळके व्हाईस चेअरमन सोमनाथ मिसाळ तसेच जय विजय शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय अस्वरे सरचिटणीस संपत मिसाळ महिला अध्यक्षा वनिता शिंदे जिल्हा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल काळे संभाजी फुले तालुका सोसायटीचे विद्यमान चेअरमन आप्पा खरात चेअरमन नितीन बनकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जिल्हा परिषद मा.सदस्य लक्ष्मण तात्या पवार भाजपचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कदम प्रशांत सरूडकर ..तालुका सोसायटी संचालक . पांडुरंग मोहिते. रामदास काटकर .अशोक राजगुरू.हमीद मुलाणी, बापूराव हाके,राजेंद्र लोहार,कैलास गायकवाड,आनंद बनसोडे, दत्तात्रय गायकवाड ,धनंजय पिसे, एकनाथ कदम,बाळासाहेब लोखंडे,.हनुमंत लोहार,राजेंद्र झेंडे, अशोक रुपनवर ,संतोष रुपनवर,रामचंद्र राजगुरू,बाबासाहेब चंदनशिवे.,बशीर मुलाणी,वीरेंद्र पतकी,प्रताप काळे, ज्ञानेश्वर मगर,मधुकर यादव,विजया गुडे- सरूडकर.यासह सर्व सदस्य उपस्थित होते. संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर मगर यांनी विषय वाचन केले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार व्हा. चेअरमन सोमनाथ मिसाळ यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम गुजर व कैलास गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रमास "धनलक्ष्मी ज्वेलर्स "कडून सर्व पदाधिकारी आणि सभासदाचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा