*बापू*
आमच्यासाठी तुम्ही आयुष्य पणाला लावलं
सत्य अहिंसेला जन्मभर नाही सोडलं पारतंत्र्याच्या विळख्यातून मुक्त केलं स्वातंत्र्याचा सूर्य आम्हांस दाखवला पण बापू तुमचा मंत्र आम्हांस जपता नाही आला
अहिंसा मधील अ आम्ही सत्यापुढे लावला
आणि सत्यास असत्य करुन टाकले आता हिंसा एवढाच शब्द उरलाय जागोजागी हिंसाच हिंसा दिसते आहे सुत कातून चरख्याने तुम्ही आम्हांस स्वदेशीचा मंत्र दिला
पण आम्ही त्याचा ही वेगळा अर्थ शोधला
चर आणि खा पोटभर
भारत मातेसाठी प्राण अर्पण केले शहीदांनी
पण आम्हाला सारे देशभक्त २६ जानेवारी, १५ ऑगस्टलाच आठवतात तेवढ्या पुरतेच देश प्रेम जागे होते धर्म जातीवरुन रोज आम्ही भांडतोय आमच्याच बांधवांचे रक्त रस्त्यावर सांडतोय
खरोखरच बापू स्वप्न तुमचे आम्ही धुळीत मिळवले
बापू.... स्वातंत्र्याचे आयते फळ आम्हाला पचवता नाही आले...
कवियंत्री नूरजहाँ फकृद्दीन शेख
गणेशगांव ता.माळशिरस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा