Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात बिस्किट व फळे वाटप

 


अकलुज ---प्रतिनिधी

लक्ष्मीकांत---कुरुडकर

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-7020 665 407

                        पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते फळे बिस्कीट वाटप करण्यात आली.

*रविवार १ ऑक्टोंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील रुग्णांना फळे बिस्किटांच्या किटचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सर्व मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भविष्यात आणखी लोक उपयोगी विधायक कामे करणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टाइम्स नाईन चे पत्रकार नौशाद मुलाणी,तनवीर तांबोळी,एमआयएम चे मोहसीन शेख उपस्थित होते.किटमध्ये केळी मोसंबी सफरचंद बिस्कीट यांचा समावेश होता.



*यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष खडतरे,डॉ.मिसाळ यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान, तालुका सह संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे,युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे,अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान,नय्युम बागवान,शोएब बागवान( सम्राट),जुबेर बागवान,ईम्रान बागवान,मोईन बागवान,मन्सूर काझी,अर्जुन कोळी,सचिन कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन साजिद बागवान,नय्युम बागवान यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा