संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
अकलूज मध्ये मुस्लिम समाजबांधवांनी ईद ए मिलादुन्नबी निमित्त मिरवणूकीचा कार्यक्रम आयोजित केला होता.मिरवणुकीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांना,भगिनींना तसेच मुले,मुलींना २५ किलो जिलेबी आणि ५०० आईस्क्रीम पॅकेटचे वाटप महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीत व हस्ते करण्यात आले.यावेळी इरफान बागवान, कुमार कांबळे,नवनाथ खंडागळे,आशुतोष साठे,बबलू साठे,गुलशन बागवान,रफिक मुलाणी,चेतन साठे उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी अकलूजमध्ये मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो महाराष्ट्र विकास सेना हा पक्ष नव्याने स्थापन करण्यात आला आहे,त्यांच्या वतीने खाऊ जिलेबी आणि आईस्क्रीम वाटप करण्यात आल्याने सर्वत्र महाराष्ट्र विकास सेनेच्या कार्यक्रमाचीच चर्चा सुरू होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा