इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
- स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत आज परीसरातील गावात श्रमदान करण्यात आले. त्यानिमित्ताने गावातील शाळा, मंदिर, मस्जिद, प्रमुख चौक, मुख्य रस्ते चकाचक करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत श्रमदान करण्यात आले. नरसिंहपुर, टणू, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी ओझरे, गणेशवाडी, लुमेवाडी, सराटी आदी गावात सदरची मोहीम राबवण्यात आली.
यामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, स्वच्छता समिती अध्यक्ष व सदस्य आदींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन श्रमदान केले.
पिंपरी बुद्रुक येथे लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅली काढून हातात विविध फलक व घोषणेद्वारे जनजागृती केली. यावेळी सरपंच भाग्यश्री सुदर्शन बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके, अशोक बोडके, बाळासाहेब घाडगे, मौलाना तय्यबभाई शेख, संतोष सुतार, ग्रामसेवक गणेश लंबाते, प्रदीप बोडरे, शंकर रणदिवे, प्रशांत चौगुले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे श्रमदानानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेली रॅली दिसत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा