Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

लुमेवाडी येथील जोधपूरी बाबांच्या उरूसानिमीत्त ३५ क्विंटल दाळ भाताचे वाटप, दर्गाहवर आकर्षक विद्युत रोषणाई, लाखों भाविकांनी घेतले दर्शन

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                          : तीर्थक्षेत्र लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील गाजी-ए-मिल्लत सुफी संत हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपुरीबाबा (रहे.) यांचा उर्स शरीफ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच महाप्रसाद म्हणून ३५ क्विंटल दाळ भात करण्यात आले. तर जियारत करून उरुस संपन्न झाला. यावर्षी अभुतपुर्व अशी सर्वधर्मियांची गर्दि पहावयास मिळली.



     हजरत सुफी वली चाँदपाशा ( आवाटी), हजरत सुफी अरिफबाबा ( मोमिनाबाद), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान ) यांच्या (जेरे-ए-निगराणी) मार्गदर्शनाखाली उरुस शांततेत पार पाडण्यात आला. काझी गल्ली (अकलूज) येथील ग्रामस्थांचा मानाचा संदल बाबांच्या मजार शरीफवर चढवण्यात आला. मुख्य उरूसच्या दिवशी राज्यासह, कर्नाटक, राजस्थान येथील सर्वधर्मिय लाखों भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. परंपरेप्रमाणे हाजी मुराद आतीष (कर्नाटक) यांचा कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला.



    परंपरेप्रमाणे उरसानिमित्त भाविकांसाठी ३५ क्विंटल डाळभाताचे लंगरखाना (महाप्रसाद) वाटप यावर्षी करण्यात आल्याचे हजरत फतेह मोहंमद जोधपुरीबाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या अकलाई बंधारा ते दर्गाह रस्त्याला ५० लाख रुपये, निवारा शेडसाठी ५० लाखांचा निधीची घोषणा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केल्यामुळे भाविक व नागरिकांनी आनंद व्यक्त केला.



    उरसानिमित्त माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, हनुमंत कोकाटे, श्रीकांत बोडके, अंकिता ठाकरे पाटील, राजवर्धन पाटील, पैलवान सिकंदर शेख आदी मान्यवरांनी दर्ग्याला भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारचे दर्शन घेतले.

    उरूसानिमीत्त लाखो महिला व पुरुष येत असतात मात्र मागील ३० वर्षात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. परंतू अत्यावश्यक बाब असणारा वजूखाना व शौचालय उभारणीसाठी निधी दिला नाही. तसेच स्थानिक नेतृत्वाने त्यासाठी प्रयत्नही केला नसल्याचे महिला भाविकांतून बोलले जात आहे.

चौकट - विजापूर (कर्नाटक) येथील सादिक लाईट व डेकोरेशन यांच्या वतीने दर्गाहवरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. भाविकांनी त्याचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले. खेळणी, ज्वेलरी, मेवा मिठाई, पर्स, बांगडी, पुस्तके आदिंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती.

फोटो - लुमेवाडी येथील सुफी संत हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबांच्या उरूसानिमीत्त दर्गाहला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

---------------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा