विशेष प्रतिनिधी --कासिम (राजु) मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
शारदीय नवरात्र नंतर अश्विन पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक तेलंगाना आंध्रा या भागातून भाविक भक्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर पायी येत असतात या पायी येणाऱ्या भाविक भक्तांना ठिकठिकाणी सामाजिक संघटना संस्था व इतरांच्या मदतीने अन्नदान केले जाते तसेच पौर्णिमेपूर्वी कर्नाटक आंध्रातील भाविक भक्त सोलापूर ते तुळजापूर शेकडो किलोमीटर पायी चालत जात असतात त्यांना पिण्याच्या पाण्याची व जेवणाची अत्यंत गरज असते त्याची जाणीव ठेवून गावातील सर्वच ग्रामस्थ ,युवक ,आपापल्या परीने भाविक भक्तांची सेवा करत असतात आणि आई तुळजाभवानीच्या भक्तांची सेवा केल्याचे आनंदही वेगळेच असते याचा प्रत्यय प्रत्येकाला येतो त्या अनुषंगाने मंगरूळ ता. तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी आई तुळजाभवानी च्या दर्शनाला चाललेल्या भाविकांना अन्नछत्र उपलब्ध करून अन्नदान केले या अन्नछत्राचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला मागील 16 वर्षा पासुन या अन्नदानाचे कार्य अखंड पणे चालूआहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा