Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

जुन्या अनिष्ट चालीरीती सोडण्यावरून पुणेरी पत्रकारांना "डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांचे सडेतोड उत्तर.

 


श्रीपूर --ज्येष्ठ ,पञकार

बी.टी.शिवशरण.

टाइम्स 45 न्युज मराठी.

                           विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित उद्धारक कार्य जोमाने सुरू होते एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमाला आले होते त्यात त्यांनी आपल्या समाज बांधवांना उपदेश करताना सांगितले की गावकीची कामे सोडून द्या पड ओढू नका जुन्या अनिष्ट चालीरीती सोडुन द्या मेलेली जनावरे ओढु नका आपल्या मुला बाळांना चांगले शिक्षण द्या आपल्या माय भगिनींनी जुन्या पद्धतीने साडी नेसण्याचे सोडून सवर्ण भगिनी नेसतात तशा साड्या नेसा व्यसन नशापान करु नका असा संदेश दिला कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात पुणेरी काही खवचट पत्रकार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न केला की तुम्ही तुमच्या समाज बांधवांचे का नुकसान करता मेलेली जनावरे ओढु नका असे तुम्ही म्हणता त्यात तुमच्या समाज बांधवांचे नुकसान होते मेलेली जनावरे ओढुन नेण्यासाठी त्यांना मोबदला दिला जातो शिवाय त्या मृत जनावरांचे मांस त्यांना खायला ऐयते मिळते यांवर त्वरित बाबासाहेब त्या पत्रकारांना म्हणाले आमच्या लोकांचे नुकसान झाले तरी चालेल पण त्या चालीरीती परंपरा सोडुन आम्ही स्वाभिमान जिणे पसंत करत आहोत बाबासाहेब पुढे म्हणाले आमचे नुकसान झाले तरी तुम्ही तुमच्या लोकांचा फायदा होत असेल तर त्यांना ती जनावरे ओढुन टाकायला सांगा शिवाय ते मांस तुम्ही घ्या यांवर त्या पुणेरी पत्रकारांची बोलती बंद झाली व त्यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडून पोबारा केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा