Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

शंकर नगर येथील सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी


 संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        अकलूज, शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर,अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. ०२/१०/२०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोन थोर महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील वरीष्ठ प्राध्यापक योगेश सावंत यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देवून त्यांच्या महान कार्याची थोडक्यात माहिती दिली. 


त्यानंतर मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी चि. शिवतेज माने- देशमुख, यांने थोर महापुरुषांच्या जिवनावर अतिशय सुंदर अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.


जयंतीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.श्रीकांत कासे यांनी काम पाहिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा