Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

स्वच्छता साफसफाई मोहिमेची नौटंकी कशासाठी

 


ज्येष्ठ -पत्रकार ,बी टी शिवशरण.

टाइम्स 45 न्युज मराठी,

                       महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशात राज्यात मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व बडे बडे नेते यांनी आपल्या शहरात गावात खेड्यात जाऊन स्वच्छता साफसफाई एक तास करण्यासाठी वेळ दिला त्या नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अगोदरच ठराविक भाग निवडून तेथे तयारी केलेली होती हातात खराटा घेऊन फोटोसेशन साठी पोज देताना स्वच्छता साफसफाई केल्याचा आविर्भावात सगळे नेते एकाच ठिकाणी हातात खराटे घेऊन उभे राहिले त्यातुन कोण झाडू मारत आहे व त्यांच्या पुढें पुढें कोण करत आहेत हे लक्षात आले नाही जर खरोखरच स्वच्छता साफसफाई करायचीच होती तर झोपडपट्टी व जिथे दररोज कचरा साठवला जातो व नेहमीच जिथे घाणीचे साम्राज्य आहे तेथे जाऊन जर सर्व कचरा घाण उचलली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे सार्थक झाले असे म्हणता आले असते सद्गुरू गाडगे महाराज यांना जी स्वच्छता साफसफाई अभिप्रेत आहे ती स्वच्छता होणं गरजेचं आहे स्वतः सद्गुरू गाडगे महाराज हातात खराटा घेऊन अख्खे गाव झाडून लख्ख करण्यात मग्न असायचे त्यावेळी ते प्रसिध्दी साठी किंवा फोटो सेशन साठी त्यांचा अट्टाहास नव्हता ज्यावेळी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जे नेते कार्यकर्ते मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वच्छता साफसफाई करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांचे अंगात नेहमीचेच स्टार्च कपडे बूट होते हातात ग्लोव्हज होते एकमेकांची चौकशी गप्पा चर्चा यांतच तास गेला फोटो काढून ते निघून गेले जर खरेच स्वच्छ साफसफाई करायचीच असेल तर झोपडपट्टी गल्ली बोळ उकिरडा यांची साफसफाई केली पाहिजे कोणाच्या तरी जयंती निमित्त व दाखवायला म्हणून असले कार्यक्रम नौटंकी पेक्षा वेगळे असू शकत नाही

*सद्गुरू गाडगे महाराज यांच्या आदर्शवत उपक्रमाची माहिती व दखल घेतली असती तरी स्वच्छता साफसफाई चा हेतु साध्य झाल्याचे आत्मिक समाधान लाभले असते




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा