अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील डॉ.शरयू संतोष शिनगारे हिची महाराष्ट्र राज्य पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ या पदावरती निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ या पदासाठी डिसेंबर महिन्यात लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.त्यामध्ये उत्तम गुणाने ती पास झालेली होती.तर सप्टेंबर महिन्यात मुलाखत होऊन तिची या पदावर निवड करण्यात आलेली आहे.
या निवडीबद्दल आ. रणजीतसिंह मोहिते- पाटील,स.म.शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, शिवशंकर बाजारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी तिचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
डॉ.शरयू शिनगारे हिचे माध्यमिक शिक्षण अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता कन्या प्रशालेत झाले.उच्च माध्यमिक शिक्षण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात झाले तर बी.व्ही.एस.सी. ॲन्ड ए. एच. चे शिक्षण काॅलेज ऑफ व्हेटर्नरी ॲन्ड ॲनिमल सायन्स परभणी येथे झाले व एम.व्ही.एस.सी चे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी ॲन्ड ॲनिमल सायन्स अकोला येथे पुर्ण केले.
डॉ.शरयू शिनगारे ही माळशिरस येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी संतोष शिनगारे व सौ.शीला शिनगारे यांची ती कन्या आहे तर अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षिका शालिनी शिनगारे मॅडम यांची नात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा