श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण .
टाइम्स 45 न्युज मराठी
मो;-9527 456 958
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष असलेले अकलूजचे किरण धाईंजे यांनी कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे केले असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान राजाभाऊ सरवदे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्यात ओळखले जातात किरण धाईंजे हे शांत मनमिळाऊ स्वभावाचे आहेत पण तितकेच ते आक्रमक व सडेतोड निर्भीड बाणा असलेले नेते आहेत समाजातील प्रत्येकांच्या सुख दुःखात सहभागी असतात कोणावरही कोणत्याही समाजातील व्यक्तीवर अन्याय त्रास झाला असेल तर अन्यायग्रस्त लोक हक्काने व न्याय मिळणारच या भावनेने अकलूजला युवक प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे यांच्या संपर्क कार्यालयात. येतात धाईंजे यांची सुरूवातीची भुमिका सकारात्मक व शक्यतो समेट घडवण्याची असते दोन्ही बाजूंची कैफियत ऐकून त्यांना जबाबदारीचे व नुकसानीचे परिणाम समजून सांगण्याचा ते प्रयत्न करतात त्यातून आता पर्यंत अनेक विषय भांडणं तक्रारी त्यांनी सोडवुन सामाजिक सलोखा जपला आहे वाद मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत केवळ आरपीआय मागासवर्गीय समाज नेते कार्यकर्ते यांच्याशीच त्यांचे ऋणानुबंध संपर्क नाही तर सर्व घटकांतील लोक नेते कार्यकर्ते यांची त्यांच्याशी चांगली मैत्री आहे दलितांच्या सामाजिक राजकीय प्रश्नांवर ते जागरूक आहेत शासनाच्या चुकीच्या ध्येय धोरणाविरोधात ते पक्षाने दिलेल्या आदेशानुसार तालुक्यात जिल्ह्यात आंदोलनात सक्रिय असतात लोकसहभागातून सामाजिक राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न कायम आग्रही राहिला आहे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी ते पुर्ण वेळ सक्रिय आहेत माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावभेट दौऱ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला आहे गाव तेथे शाखा हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यांनी येत्या काळात संकल्प सोडला आहे विशेष म्हणजे तालुक्यातील गटतट मतभेद संपवून राजाभाऊ सरवदे यांचें नेतृत्वाखाली सर्व नेते कार्यकर्ते एकत्र आणण्यासाठी त्यांनी पहिल्या पासून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत जवळपास नव्वद टक्के कार्यकर्ते एकत्र आल्याने गटबाजीला लगाम बसला आहे येत्या काळात पक्षाचे धोरण आदेश याचे पालन करण्यासाठी व स्थानिक पातळीवर सर्व निवडणुका सक्षमपणे लढण्यासाठी पक्षाचे कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल अशी त्यांची भूमिका आहे तालुक्यातील आरपीआय आठवले गटाची सामाजिक राजकीय वैचारिक बांधणी मजबूत करुन राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली पक्षाची उभारणी संघटन व्यापक केले जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा