संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
अकलूज येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी नोकर भारतीचा जी.आर. काढण्यात आला होता या निर्णयाला राज्यातून जनतेचा विरोध होत होता त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हा जी.आर. रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा च्या वतीने आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस धैर्यशील भैय्या मोहिते पाटील सोलापूर जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु, अकलूज शहर भाजप शहराध्यक्ष महादेव कावळे विशाल मोरे, रशीद मुलानी, उत्कर्ष शेठ, प्रमोद शहाणे शैलेश दिवटे अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य साठे, प्रशांत साळुंखे ,डॉ. निलेश ननवरे व सर्व भाजपचे पदाधिकारी भाजपचे सर्व बुध अध्यक्ष व सर्व पदाधिकारी अकलूज येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा