संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सोमवार २३ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथील शासकीय आयटीआय मैदानावर सायंकाळी ५ वाजता लॉन्गमार्च प्रणेते,माजी खासदार तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या नेतृत्वात विशाल संविधान सन्मान मिळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला राज्यातून हजारो युवक कार्यकर्ते भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिली.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर तर विशेष निमंत्रित म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व विशेष उपस्थितीमध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष भाई जयदिप कवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे,राष्ट्रीय महासचिव जे.के.नारायणे,प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे,राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे,कार्याध्यक्ष चरणदास इंगोले,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेशराव पडघन,प्रदेश महासचिव बापूराव गजभारे,प्रदेश संघटन सचिव प्रमोद टाले,उपाध्यक्ष जगनभाई सोनवणे,ज्येष्ठ नेते प्रा.इ.मो.नारनवरे यांची उपस्थिती राहील.
या राज्यस्तरीय विशाल संविधान सन्मान मेळाव्याला राज्यातून हजारोंच्या संख्येने युवा भिमसैनिक उपस्थित राहणार असल्याचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सांगितले सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर भिमसैनिक उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा