Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

आज 22 आॕक्टोबर;- अशफाकउल्ला खान यांची जयंती-- हसत हसत फासावर चढले वीर क्रांतिकारक शहीद -- --अश्फाक उल्ला खान

 


उपसंपादक---नुरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी.

                  सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है !

                देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में हैं 

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामच्या इतिहासामध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्लाह यांची भूमिका हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण

 *भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती*. 

अशफाक उल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील शहीदगढ शाहजहानपूर मध्ये रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या कदनखैल जलालनगर मोहल्ल्यात 22 ऑक्टोबर 1900 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद शफीक उल्ला खान होते. त्यांची आई मजहूरुन्निशॉं बेगम . त्यांचे पूर्ण नाव अशफ़ाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. 

         अशफाक आपल्या भावंडांत सर्वात लहान होते. सर्व प्रेमाने त्यांना "अच्छू " म्हणत असत. एके दिवशी त्यांचे मोठे भाऊ रियासत उल्ला यांनी अशफाक यांना बिस्मिल यांच्या बद्दल सांगितले की,"ते एक समर्थ व्यक्ती आणि उत्तम दर्जाचे कवीही आहेत. मात्र हल्ली मैनपुरी कांडामध्ये अटक झाल्याकारणाने शहाजहानपूरमध्ये दिसत नाहीत. देव जाणे कुठे आणि कोणत्या स्थितीत रहात असतील. बिस्मिल त्यांचा सर्वात चांगला क्लासफेलो आहे". 

      अशफाक तेव्हापासूनच बिस्मिल यांच्या भेटीसाठी उतावळे झाले.काळ पुढे लोटला. अशफाक यांनी कित्येकदा बिस्मिल यांची भेट घेऊन त्यांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला, पण ते असफल राहिले. एके दिवशी रात्री खन्नौत नदीच्या किनारी एका सुनसान जागेवर मीटिंग चालू होती तिथे अशफाक पोहोचले. बिस्मिल यांच्या एका चारोळी (शेर) वर जेव्हा अशफाक यांनी "आमीन" म्हटले तेव्हा बिस्मिल यांनी त्यांना जवळ बोलावून त्यांचा परिचय करून घेतला. बिस्मिल यांना समजले की, अशफाक हे त्यांचे क्लासफेलो रियासत उल्ला यांचे सख्खे लहान भाऊ आहेत, तसेच उर्दू भाषेचे शायर (कवी) आहेत, आणि बिस्मिल यांनी त्यांना आर्य समाज मंदिरात येऊन वैयक्तिक भेटीसाठी बोलाविले.

          घरच्यांचा विरोध असून देखील अशफाक आर्य समाजात पोहोचले आणि राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी खूप वेळच्या चर्चेनंतर त्यांच्या पार्टीचे(मातृवेदी चे) ॲक्टिव्ह मेंबर(सक्रिय सदस्य)ही झाले. येथूनच त्यांच्या जीवनाची नवी कहाणी सुरू झाली. ते कवी तर होतेच, त्या बरोबरच ते देशभक्तही बनले .

       "हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन " ने शस्त्रास्त्रे पैदा करण्यासाठी आपल्याच देशात पैसा उभा केला पाहिजे हे ठरवले . त्यासाठी त्यांच्यापैकीच एक राम प्रसाद बिस्मिल यांनी ही जबाबदारी घेतली .त्यांनी सुरुवातीलाच खुलासा केला की " आपण फक्त सरकारी खजिन्यावरच हल्ले चढवून रक्कम हस्तगत करायची. कोणाही व्यक्तीला आपल्याकडून हानी पोहोचता कामा नये .नाहीतर आपण लोकांची सहानुभूती गमावून बसू"रोशनलाल आणि अश्फाक उल्ला खान हे राम प्रसाद बिस्मिल यांचे दोन प्रमुख सहकारी 

 त्यांना माहिती मिळाली की 9 ऑगस्ट 1925 या दिवशी सहारनपुरहुन लखनौ कडे जाणाऱ्या गाडीत गार्डच्या डब्या मध्ये सरकारी खजिन्याची पेटी ठेवण्यात येणार आहे. या रेल्वेवर हल्ला करण्यासाठी त्यांनी काकोरी हे स्टेशन निवडले . हे तिघे जण आपल्या सात सहकाऱ्यांनीशी काकोरी स्टेशन वर गाडीची वाट पाहत उभे राहिले. गाडी आली. थांबली . सुटणार एवढ्यात दहा जण डब्यात शिरले. गाडी अचानक का थांबली हे प्रवासी पाहू लागले .त्यांनी डाब्याबाहेर पडू नये म्हणून क्रांतीकारकांनी हवेत गोळीबार केला .फलाटावर उतरलेले प्रवासी लगबगीने आत जाऊन बसले. दोघेजण गार्डच्या डब्यात शिरले होते .त्यांच्या हातातील पिस्तुले पाहून गार्ड घाबरून गेला त्याने खजिन्याची पेटी क्रांतिकारकांच्या हवाली केली. त्यांनी तिच्यातील नोटांची पुडकी पोत्यांमध्ये भरली. ज्या वेगाने क्रांतिकारक काकू येथे आले होते त्याच वेगाने ते गाडीतून उतरून झाडाझुडुपांमध्ये अदृष्य होऊन गेले .पुढे एकेक करत बरेच जण पोलिसांच्या हाती लागले.

एका वर्षापर्यंत ब्रिटीश नोकरशहा तुम्हाला वेड्यासारखे जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी बेचैन होते, परंतु त्यांना अटक करण्यास शक्य झाले नाही. ब्रिटीश अधिका्याने अशफाकउल्ला खान साहेबांच्या गावातील एका व्यक्तीला मोठ्या लोभाने खरेदी केले आणि हेरगिरीसाठी त्याला लावले, ज्याच्या माहितीवरुन तुम्हाला दिल्लीहून अटक केली गेली. *जेव्हा ट्रायल सुरू झाले तेव्हा आपण आपल्या डोक्यावर संपूर्ण जबाबदारी घेतली. जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्याने रामप्रसाद बिस्मिलबद्दल विचारले तेव्हा तुम्ही म्हणालात की जेव्हा मी असे सांगितले की या घटनेची संपूर्ण योजना माझी आहे, तर मग कोणाचे नाव का घेतले जात आहे?* मी पुन्हा कबूल करतो की मी त्यात जे काही केले आहे ते मी माझ्या इच्छेने केले आहे.

यामध्ये कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली. अखेर अश्फाक उल्ला खान यांना अंतिम इचछा विरण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की " मेरे मर जाने के बाद रख दे कोई मेरे कफन के अंदर सीने पर मेरे वतन की मिट्टी " अशी अंतिम इचछा व्यक्त करुन् स्वतः. फाशीचा फ़ंदा गळ्यात आपल्याच हताने अडकवला . 19 डिसेंबर 1927 ला फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले.

       भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या इतिहासामध्ये रामप्रसाद बिबस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा