Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

मानवाच्या जीवनमरणाशी खेळणाऱ्या "डॉल्बी "वर बंदी घालणे काळाची गरज.--इक्बाल मुल्ला

 


टाइम्स 45 न्युज मराठी.

                           कर्णकर्कश डॉल्बी च्या "दणदणाटामुळे" लहान मुले ते घरातील वृद्ध .सर्वांच्या कानाचे पडदे फाटले आहेत . डॉल्बीच्या एका मिरवणुकीनंतर कानाच्या डॉक्टर कडे शेकडो कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेतली आहे , गरोदर स्त्रियांच्या गर्भपाताच्या घटना वाढत आहेत , डॉल्बीमुळे हृदयविकाराच्या घटना निदर्शनास येत आहेत ,ब्लडप्रेशर चे प्रमाण वाढत आहे ,डॉल्बीमुळे तरुणाईच्या मानसिक असंतुलनामध्ये" वाढ होत आहे , डॉल्बीच्या प्रचंड आवाजाने "बंगला" असो वा "घर" सर्वांच्या घरातील भांडी खाली पडत आहेत, धक्कादायक म्हणजे या वर्षी दोन युवकांचा डॉल्बीच्या तुफान आवाजामुळे मृत्यू झाला ... आता *जिल्हाधिकारी कार्यालय - पोलीस अधीक्षक - महापालिका आयुक्त आणखी कशाची "प्रतीक्षा" करणार आहेत ??? ते जनतेच्या जीवन - मरणाशी खेळणाऱ्या डॉल्बी वर बंदी का घालत नाहीत ??

परमेश्वरापुढे "नथमस्तक" व्हायचे असते , "तल्लीन" व्हायचे असते ,धाबडधिंगाणा घालून , बेफाम "नृत्य" करून देवाचा अपमान करायचा नसतो, हे कधी लक्षात येणार ??



पारंपारीक वाद्ये ही भारताची ,"महाराष्ट्राची " शान व परंपरा असताना ,डॉल्बीच्या प्रचंड आवाजाची स्पर्धा कशाला ??

आज जैन समाज ,ख्रिश्चन समाज ,गुजराथी समाज त्यांच्या -त्यांच्या सणावेळी असे डॉल्बी लावून बेधुंद होऊन नाचलेले पहिले आहे का ?? त्यांच्या देवाधर्माच्या ते अपमान करू देतात का ?? ते आपापल्या देवांचा सन्मान करत असतील तर आपण आपल्या देवाचा अपमान का करतोय ??? देवासमोर असताना ,त्याच्यासमोर चुकीच्या पद्धतीने गोंधळ घातला आणि सर्वसामान्य जनतेच्या कानाला डॉल्बीचा प्रसाद दिला तर परमेश्वर प्रसन्न होईल का ??? जनतेने आदर्श घ्यावा असे कार्य आज "अपेक्षित" आहे .

आज महाप्रसादाच्या माध्यमातून हजारो लोकांना जेवणाची व्यवस्था केली जाते . त्या समस्त मंडळांचे हार्दिक अभिनंदन ! 

सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वर सुखी ठेवो ,ज्यांनी गरजू व गरीब लोकांच्या पोटाला अन्न दिले ,त्यांना "समाधानी" केले . याबद्दल सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहे . 

काही मंडळे लहान मुलांच्या -महिलांच्या विविध गुणदर्शन "स्पर्धा" आयोजित करून त्यांच्या कलागुणांना "उत्तेजन" देतात, स्पर्धकांना बक्षीस देतात ,त्यांचे ही कार्य अभिनंदनीय आहे . 

सांगलीतील राममंदिर जवळील संजोग गणेशोत्सव मंडळ हे विविध स्पर्धा घेत,उत्कृष्ठ बक्षिसे देत , लहान मुलांना - महिलांना उत्तेजन देणारी उज्वल "परंपरा" टिकवून आहे .चांगल्या कार्याचा असा कौतुकसोहळा होतो , आणि संपूर्ण महाराष्ट्रात "आदरतिथ्य" होते .

भविष्यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांनी डॉल्बी ला "फाटा" देत "पारंपरिक वाद्यांना" 50 डेन्सीबल पर्यंत च्या आवाजाची मर्यादा आखून द्यावी . जेणेकरून हा आनंदसोहळा ,जनतेला 

"सुखावणारा" - समाधानाचा - सुखाचा -समृद्धीचा आणि कृपाशिर्वादाचा ठरेल.      


 इकबाल बाबासाहेब मुल्ला

( पत्रकार )

संपादक - सांगली वेध, 

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .

मोबाईल - 8983587160



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा