अकलुज--- प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो;--9860 112 351
अकलुज येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशाचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, 'मिसाईल मॅन' म्हणून परिचित असणारे भारतरत्न , डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या शुभहस्ते डाॕ.आब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट पवार यांनी केले त्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावर व त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा करण्यात येणाऱ्या 'वाचन प्रेरणा दिन' याची माहिती सांगितली. विद्यालयातील विद्यार्थिनी कु. सानवी म्हस्के हिने इंग्रजी तर कु. साहिमा शेख हिने मराठी भाषेमध्ये डॉ. कलाम यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक मा. श्री. फुले सर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती विषद करताना त्यांच्या बालपणातील ध्येयाची, शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या संशोधनाची, क्षेपणास्त्र मोहिमेतील त्यांच्या योगदानाची तसेच देशाचे राष्ट्रपती म्हणून केलेल्या कार्याची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कलाम यांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन मोठे ध्येय ठेवून स्वप्ने पूर्ण करावी असे सांगितले.
वर्गशिक्षिका . सुनीता ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ९ वी ई च्या वर्गाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
डॉ. कलाम यांच्या जयंती निमित्त विद्यालयाच्या 'अटल टिंकरिंग लॅब' मध्ये त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. तसेच ' वाचन प्रेरणा दिन' हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन केले.
तसेच याप्रसंगी शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सोरेगाव, सोलापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत उज्वल यश मिळवून विभागीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा व क्रीडा मार्गदर्शकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे , विनायक रनवरे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, राजन चिंचकर, शिक्षक प्रतिनिधी संजय नागणे, धनंजय मगर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्वा सातभाई यांनी काले तर आकांक्षा वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा