अकलूजच्या" सद्गुरु गहिनीनाथ" बँकेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
सदगुरू गहिनीनाथ अर्बन को-ऑप बँक, अकलूज या बँकेला राष्ट्रीय पातळीवरील 'बॅंको ब्लु रिबन' हा पुरस्कार देवून दमण येथे नुकतेच सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
२५ ते ४० कोटी रुपये या कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 'बॅंको' च्या वतीने रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पि.के.अरोरा यांच्या हस्ते सदगुरू गहिनीनाथ अर्बन को-ऑप बँकेला राष्ट्रीय पातळीवरील 'बॅंको ब्लू रिबन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दमन येथील हॉटेल डेल्टीन येथे झालेल्या शानदार सोहळ्यात सदगुरू गहिनीनाथ बँकेचे चेअरमन डॉ.अरविंद गांधी,व्हा.चेअरमन ऍड.शिरीष फडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे यांनी या पुरस्काराचे सन्मानचिन्ह स्वीकारले.
याप्रसंगी बॅंकोचे मुख्य संचालक अशोक नाईक,अविनाश शिंदे,अविनाश जोशी,विवेक घळसासी, अतुल खिरवाडकर उपस्थित होते.सदगुरू गहिनीनाथ बँकेने ३५ कोटी रुपये ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून मागील आर्थिक वर्षात बँकेस ६२ लाख ७१ हजार रुपये इतका नफा झाला असून बँकेस 'अ'ऑडिट वर्ग मिळाला आहे.सदगुरू गहिनीनाथ बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असून बँकेचा सीआरएआर ५०.३१ टक्के आहे.सदगुरू गहिनीनाथ बँकेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी,मॅनेजर व सर्व कर्मचारी यांचे बँकेचे सभासद,ठेवीदार,कर्जदार त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून बँकेच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी-
सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑप बँकेस राष्ट्रीय पातळीवरील मिळालेला पुरस्कार स्वीकारताना डॉ.अरविंद गांधी,शिरीष फडे, नंदकुमार गोरे आदी.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा