अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने ऊस पिक परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन २६,२७ व ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.अशी माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ऊस हे शाश्वत उत्पादन देणारे पीक असून सोलापुर जिल्हा ऊस उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. ऊस शेती करणा-या शेतक-यांच्या समोरील अडचणी वाढत असून त्यांना वारंवार रोग,किड,पुर परिस्थिती तसेच अवर्षण यामुळे ऊस पिकातुन एकरी उत्पादन कमी प्रमाणात होऊन शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.हे नुकसान टाळुन एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणेकरिता मार्गदर्शनपर ऊस पीकाचे अभ्यासक तज्ञ व संशोधक यांचे ऊस पिक परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिनांक २६, २७ व ३१ ऑक्टोबर रोजी केलेले आहे.
सदर परिसंवाद गुरुवार दि. २६/१०/२०२३ रोजी कृषीरत्न डॉ.संजीव माने कृषीनिष्ठ शेतकरी ता.वाळवा जि.सांगली व श्री अरुण देशमुख कृषीतज्ञ, नेटाफिम इरिगेशन,पुणे विभागीय कार्यालय लवंग या ठिकाणी होणार आहे तर शुक्रवार दि. २७/१०/२०२३ रोजी डॉ.सुनिल दळवी वरिष्ठ शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी,पुणे व श्री. अरुण देशमुख कृषीतज्ञ, नेटाफिम इरिगेशन,पुणे विभागीय कार्यालय वेळापुर या ठिकाणी होणार आहे.तसेच मंगळवार दि. ३१/१०/२०२३ रोजी डॉ.अशोक कडगल वरिष्ठ शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी पुणे यांचे विभागीय कार्यालय साळमुख या ठिकाणी ऊस पिकावरील रोग, किड, पुर परिस्थिती व अवर्षण परिस्थीतीमध्ये ऊस पिकाचे व्यवस्थापन करून एकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याकरिता आवश्यक उपाय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तरी परिसरातील शेतक-यांनी परिसंवाद व चर्चासत्रास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकार महर्षी कारखान्याचे संचालक मंडळ आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा