Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

अकलूज बस आगार आणि माळशिरस व नातेपुते बस स्थानकांचा बी ओ टी तत्त्वावर विकास होणार--आमदार रणजितसिंह मोहिते पाटील.

 


संपादक ---हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.;- 9730 867 448




                                माळशिरस तालुक्यातील अकलूज बस आगार व माळशिरस आणि नातेपुते येथील बस स्थानक यांचा बी ओ टी तत्त्वावर विकास करण्यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी या तिन्ही ठिकाणी जाऊन बस स्थानकांची माहिती घेतली व नागरिकांकडून विकास करण्या संदर्भातील सूचना ऐकून घेतल्या .राज्यातील २०० स्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास होणार आहे . त्यामध्ये अकलूज ,माळशिरस आणि नातेपुते बस स्थानकांचा समावेश करण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील प्रयत्नशील आहेत .या पाहणी दौऱ्यावेळी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील , युवा नेते व अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील , विश्वतेजसिंह मोहिते पाटील , राज्य शासनाच्या पॅनल वरील अधिकारी सुशील देशमुख ,आर्किटेक कोष्टी , अकलूजचे वर्कशॉप व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी ,या तिन्ही नगरपरिषद व नगरपंचायतीचे पदाधिकारी ,मुख्याधिकारी व त्या - त्या गावातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा