इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- पुणे जिल्ह्यात भाद्रपद महिन्यातील बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. बैल, गाय, म्हैस व शेळ्यांना रंगवून त्यांना मिष्टान्न खायला घालून त्यांची पूजा करण्यात आली. तर अनेक शेतकऱ्यांनी हौसेखातर बैल, गायींची हलगी लेझीमाच्या तालावर नाचत मिरवणूक काढली.
नरसिंहपूर परिसरात पिंपरी बुद्रूक येथील प्रगतशील बागायतदार केशव बोडके यांनी आपल्या देशी गाईला भीमा नदीच्या पाण्याने धुवून त्याच्या शिंगांना हिंगूळाचा रंग लावला. तर, लाल रंगाने संपूर्ण शरीर सजवून घेतले. त्यानंतर त्यांच्या शिंगात शिंबी घालून अंगावर रंगीबेरंगी झूल घालण्यात आली. त्यानंतर त्यांना कुडबूळ, पुरण पोळीचा मिष्टान्न नैवेद्य दाखवून ओवाळण्यात आले. संपूर्ण कुटुंबीयांनी गाईच्या पायाला हात लावून दर्शन घेतले.
परीसरातील टणू, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, गणेशवाडी, लुमेवाडी, सराटी आदी गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला. गावोगावी मानाच्या बैलांची ग्रामस्थांच्या बैलांची मिरवणूक डिजे, लेझीम, हलग्यांच्या निनादात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक निघाली. बैलपोळा सणानिमित्त सर्वांच्या घरी पुरणपोळीच्या मिष्टान्न जेवणाची सोय करण्यात आली. तर रविवारी चिकन, मटन, मासे आणून पाहुण्यांना जेवण घालून कर साजरी केली.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील केशव बोडके यांनी देशी गाईची पुजा करत बैलपोळा साजरा केला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा