Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

नीरा नरसिंहपूरच्या सरपंचपदी सौ. अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड

 


S B Tamboli

इंदापूर तालुका प्रतिनिधी 

                                 - तिर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूरच्या सरपंचपदी सौ. अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस. बी. हगारे यांनी निवडणूकीची प्रक्रिया पार पाडली. 



    ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सौ अर्चना नितीन सरवदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी हगारे यांनी जाहीर केले. तलाठी शिवाजी बिराजदार, ग्रामसेवक महेश म्हेत्रे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.

  यावेळी उपसरपंच रेणूका काकडे, रूपाली कोळी, जयश्री राऊत, कोमल मोहिते, सुनिल मोहिते, गुरुदत्त गोसावी, विठ्ठल देशमुख, 

 पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदीप जगदाळे, आण्णा काळे, नितीन सरवदे, माजी उपसरपंच नरहरी काळे, जगदीश सुतार, नाथाजी पाटील, हनुमंत काळे, आनंद काकडे, विजय सरवदे, प्रशांत बादले, दशरथ राऊत, चंद्रकांत सरवदे, शहाजी पावसे, आबा मोहिते, अतुल घोगरे, लखन सरवदे आदी उपस्थित होते.

फोटो - नुतन सरपंच सौ. अर्चना नितीन सरवदे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा