श्रीपुर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी.
महाराष्ट्रातील आरक्षणाचा लाभ इतर जातींना प्राधान्याने मिळत असून महार जातीला जाणुनबुजून वगळण्याचे काम नोकरशहा करत आहेत नोकरी मध्ये महार जात वगळून इतर जातींना प्राधान्य दिले जात आहे प्रस्थापित समाज व्यवस्थेत बारा बलुतेदार यांना प्रत्येकाला त्यावेळी जगण्यासाठी पारंपरिक व्यवसाय धंदे होते यात एकच जात अशी आहे की महार जातीला कोणताच धंदा अगर व्यवसाय नव्हता शिक्षणातील नोकरीतील आरक्षण इतर मागासवर्गीय समाजातील समाज घटकांना देत असताना हेतुपुरस्सर महार जात वगळली जात असल्याने या जातीवर घोर अन्याय होत आहे सवलती आरक्षण सामाजिक अन्याय अत्याचार जातीवाद अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा महार जात आक्रमक होऊन लढाईत उतरते बंद निषेध आंदोलन मोर्चा काढण्याची वेळ येते तेव्हा जातीच्या नावावर सवलती घेणारे लाभ घेणारे त्यावेळी घरांत बसवतात लढतात फक्त महार आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन महार स्वाभिमान स्वातंत्र्य हक्कासाठी जेलमध्ये जातो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकला जातो अलिकडे मराठा धनगर मुस्लिम ओबीसी समाज आरक्षण मिळावे म्हणून रस्त्यावर उतरला आहे मराठा समाजाला किमान दोन एकर जमीन तरी कसण्यासाठी असते धनगरांकडे कमीतकमी दहा ते पन्नास शंभर मेंढ्या असतात थोडीफार जमीन असते गावात घर वाडा असतो पण महार समाजातील काही अपवादात्मक कुटुंब सोडले तर त्यांना जगण्यासाठी उद्योग धंदे व्यापार नसतो जमीन नसते जे आरक्षण आहे त्याचा लाभ व फायदा महार सोडून इतर जाती घेतात या सर्व विषयांची जंत्री पाहिल्यानंतर महार समाजाला वेगळे व स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज आहे महार समाज एवढ्या अडचणी समस्या व उपेक्षित असतानाही तो सध्या शांत आहे भविष्यात महार जातीतील लोकांना त्यांच्या मुलांना स्पर्धेत टिकण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे महार जात आक्रमक आहे स्वाभिमान अस्मिता त्यांच्या रक्तात भिनलेली आहे महार समाजाला शैक्षणिक नोकरीत आरक्षण देताना जाणूनबुजून वगळले जात असेल तर ते कसे मिळवायचे आंदोलन काय असते यासाठी रस्त्यावर येण्यासाठी वेगळं सांगण्याची गरज नाही कारण विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे प्रमाण मानून इथून पुढची आरक्षणाची लढाई कशी खेळायची याचे बाळकडू महार जातीला घराघरांत मिळाले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा