इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: भाद्रपद मासातील अमावास्येच्या दिवशी जिल्ह्यात शेतकरी राजा सर्जा राजाचा बैलपोळा सण साजरा करतात. त्यानिमित्त परिसरातील बाजार पेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. परंतु यात्रिकीकरणाच्या जमान्यात बैलांची संख्या कमी झाल्याने पूजेसाठी मातीचे बैल घेण्याकडेही कल वाढला आहे. तर दुधाच्या दरात वाढ झाल्याने गाय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाने पाच महिन्याची दांडी मारल्याने शेतकरी राजा संकटात सापडला असल्याने सर्वच मालाचे दर स्थिर व माफक ठेवल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले असल्याचे व्यापारी नीलेश चिखले व सावंत भाऊसाहेब यांनी सांगितले.
बैलपोळ्यासाठी सुताचे तयार माल वेसण, म्होरकी, पितळी साखळ्या, बेगड, पायांतील तोडे, पट्ट्या याप्रकारचा तयार माल सध्याला सहजरीत्या उपलब्ध होत आहे. पूर्वी मात्र अशा प्रकारचा माल मजुरांकडून हजेरीत तयार करून घ्यावा लागत होता. परिसरातील अकलूज, नीरा नरसिंहपूर, टेंभुर्णी, पिंपरी बुद्रुक, बावडा, रेडणी, इंदापूर आठवडे बाजारात पावसाअभावी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे बाजारपेठेत बैल पोळ्याच्या खरेदीसाठी हळूहळू गर्दी वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.
बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे दर मागील वर्षी पेक्षा प्लास्टिकचे दर उतरल्याने कमी झाल्याचे व्यापारी निलेश चिखले यांनी सांगितले. त्यामध्ये बैलाच्या अंगावरील झूल १४०० ते ३२०० रुपये, बाशिंगे १८० ते २९०, घुंगरमाळ ७०० ते ११००, पायांतील चाळ १०० ते २००, दृष्टीच्या माळा ७० ते १००, शिंवा १६० ते ५५०, कवड्यांच्या माळा ७० ते १८० रुपये, सुताची दोरी १५० ते ३०० काळा व रंगीत गोप २०० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. सुताचे प्रमाण वाढून तयार मालाला बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
फोटो - बावडा येथील आठवडी बाजारात बैलपोळा सणाच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा