विशेषा ----प्रतिनिधी राजु (कासिम) मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात विवाहप्रसंगी नववधूला दहा ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये रोख आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डी. श्रीधर बाबू यांनी सांगितले, की विवाहप्रसंगी एक लाख रुपयांच्या रोख निधीव्यतिरिक्त, पक्षाच्या ‘महालक्ष्मी हमी’योजनेंतर्गत नववधूला सोनेही दिले जाईल. भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) सरकारतर्फे सध्या ‘कल्याण लक्ष्मी’ आणि ‘शादी मुबारक’ योजना राबवली जाते. याअंतर्गत, विवाहप्रसंगी १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष दोन लाखांपेक्षा जास्त नाही अशा महिलांना लग्नाच्या वेळी एक लाख ११६ रुपये आर्थिक मदत दिली जाते.काँग्रेसच्या या आश्वासनांवर टीका करताना बीआरएसचे प्रवक्ते श्रावण दासोजू म्हणाले, की ते काहीही आश्वासन देऊ शकतात. मात्र, त्यांनी कर्नाटकमध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासने आता पूर्ण करता येत नाहीत
सौजन्य --
आवाज महाराष्ट्राचा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा