Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

तरंगफळ ता.माळशिरस येथे विविध विकास कामाचे आ.रणजितसिंह मोहिते पाटील व आ.राम सातपूते यांच्या हस्ते उदघाटन व भूमीपूजन संपन्न .


 

संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                         तरंगफळ ता. माळशिरस येथे माळशिरस ते पिलीव रोडसाठी 24 कोटी रुपये, तरंगफळ गोरडवाडी रोड साठी 4 कोटी रुपये, तसेच आरो युनिटचे उद्घाटन, पुतळा शुभशोभीकरण कामाचे, पंधराव्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते , यांच्या हस्ते संपन्न झाला.



      तसेच जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज तरंगफळ यांचा तसेच आचार्य दादासाहेब दोंदे उत्कृष्ट शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ यांना मिळाल्याबद्दल तसेच शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी तरंगफळ चा सुपुत्र नागनाथ संपत साळवे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवात गोल्डन बॉय पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच केंद्रीय पोस्ट भरती मध्ये ब्रांच पोस्टमास्टर म्हणून निवड झाल्याबद्दल मयुरी गोरख जानकर व वैष्णवी गोरख जानकर या भगिनींचा तसेच कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल यशराज दत्तात्रय सावंत या सर्वांचा सत्कार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले.



      सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पासून चालू असलेली तरंगफळ ची विकासाची परंपरा अशीच पुढे नेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरंगफळ गावाला विकास निधी कधीच कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी केले.

   यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, युवा नेते दत्ता भैय्या मगर बांधकाम विभागाचे गोविंद कर्णवर पाटील, बीजउत्पादक सहकारी संस्थेचे व्हा चेअरमन सुजित तरंगे, सरपंच पद्मिनी नारायण तरंगे, नारायण तात्या तरंगे, माजी सरपंच भागवत तरंगे,अँड. शांतीलाल तरंगे, गारवाड सरपंच सुभाष साठे, ग्रामसेवक संतोष पानसरे, उपसरपंच पांडुरंग कांबळे, जयंतीलाल तरंगे, महादेव तरंगे, मधुकर तरंगे, सतीश कांबळे, शशिकांत साळवे, जगुबाई जानकर, राधाबाई तरंगे, तलाठी रुकसार तांबोळी मॅडम, भानुदास तरंगे, ज्ञानदेव जानकर, नारायण कर्चे, महाको जानकर, मानआप्पा तरंगे, संभाजी तोरणे, बापू पाटील, अविनाश मोहिते, संजय कोडलकर, सुहास तरंगे, किरण तरंगे, अक्षय तरंगे, डॉक्टर महादेव वाघमोडे, गोविंद कांबळे, संजय वाघमोडे, युवराज नरोटे, संजय देशमुख, दादासो काळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपभियंता बाबर , बांधकाम विभागाचे उपअभियंता रणवरे साहेब, आदी गारवाड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा