संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
उस्मानाबाद येथील पंचायत समिती मधील वरिष्ठ सहाय्यक लेखापाल मिलींद सुर्यकांत कांबळे, वय ४५ वर्ष, रा. विक्रम नगर, बौध्दी चौक, लातुर ( खाते ग्रामविकास पंचायत समिती) (वर्ग- ३) याने ४०००रु ची लाच स्विकारताना आणि हनुमंत गोपाळराव पवार ,वय ६९ वर्षे सेवानिवृत्त सहाय्यक खनिष्ठ अभियंता रा.सटवाईवाडी पो.तेरखेडा ता.वाशी जि.उस्मानाबाद सध्या रा.काकडे प्लाॕट दत्तनगर उस्मानाबाद (खाजगी इसम) यांनी लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणुन लाचलुचपत प्रतिबंधक उस्मानाबाद यांनी रंगेहाथ पकडून या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधकविभागा ने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांचे कडून थोडक्यात मिळालेली माहिती अशी की तक्रारदार यांची आई उस्मानाबाद जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी( आ. )ता. जि. उस्मानाबाद या शाळेतुन शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या असुन त्यांना शासनाकडुन मिळणा-या अंशराशीकरण व उपदानाची एकुण १५,२९,८०४/- रूपये रक्कम तक्रारदार यांच्या आईच्या खात्यावर जमा करून देण्यासाठी यातील आरोपी क्रमांक १) मिलिंद सूर्यकांत कांबळे वय 45 वर्षे वरिष्ठ सहाय्यक लेखापाल पंचायत समिती उस्मानाबाद यांनी दि. २६.०९.२३ रोजी पंचासमक्ष ४०००/- रूपये लाचेची मागणी करून दि. २८.०९.२३ रोजी आरोपी क्र. १ मिलिंद सूर्यकांत कांबळे यांनी स्वतः लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. तसेच आरोपी क्र. २ हनुमंत गोपाळराव पवार यांनी लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले. वगैरे मजकुर वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३७३/ २०२३ कलम , नगर प्रशासन अधिनियम सन १९८८ प्रमाणे गून्हा दाखल दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक लासलुजपत प्रतिबंध विभाग उस्मानाबाद व पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, नागेश शेरकर, सचिन शेवाळे, अविनाश अचार्य लावि उस्मानाबाद युनिट यांनी केली आहे.
-----------------------------------------------------
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी माहिती असल्यास
अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबददल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा.
संपर्क पत्ता संकेतस्थळ
ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन टोल फ्रि क्रमांक
:- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद.
:- १. acbwebmail@mahapolice.gov.in २. dysposmanabad@gmail.com
:- acbmaharashtra.net
:- १०६४
:- ०२४७२-२२२८७९
:- ९९२३०२३३६१
दुरध्वनी क्रमांक
पोलीस अधीक्षक, लाप्रवि, औरंगाबाद पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, उस्मानाबाद
:- ९५९४६५८६८६
(सिध्दाराम म्हेत्रे) पोलीस उप अधीक्षक
अॅन्टी करप्शन ब्युरो, उस्मानाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा