Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

कौटुंबिक वादातून आणि "लग्नासाठी मुलगी का बघत नाही" म्हणून मुला ने केली आई-वडिलांस मारहाण.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                      कौटुंबिक वादातून तसेच लग्नासाठी मुलगी का बघत नाही अशी विचारणा करत दारूच्या नशेत मुलाने आई-वडिलास मारहाण केली. या घटनेनंतर रागाच्या भरात मुलाच्या आईने विषारी औषध पिलं. ही घटना माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे घडली.


वडील संजय भगवान घळके (वय 62 राहणार काटे गल्ली माळीनगर )यांनी याबाबत मुलगा राकेश संजय घळके( वय 28 राहणार काटे गल्ली माळीनगर) याच्या विरोधात पोलिसात फिर्याद नोंदवली आहे .राकेश दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री गणपतीचे विसर्जन करून उशिरा परत आला व दारूच्या नशेत त्याने जोरात दारावर लाथा मारल्या .त्यावेळी आईने दरवाजा उघडला त्यानंतर मुलाने तुम्ही माझ्या लग्नासाठी मुलगी का बघत नाही,तसेच अनेक कौटुंबिक कारणावरून शिवीगाळ करत होता . तसेच आईला लाथाबुक्याने मारले व आईचा गळा दाबत होता त्यावेळी त्याच्या वडिलांनी सोडवण्यासाठी पुढे गेले असता त्यांनाही त्याने मारहाण केले. यात वडिलांचे हात फ्रॅक्चर झाला आहे .आईने रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले आहे . दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार चालू आहेत .पुढील तपास पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुंभार करीत आहेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा