गणेशगांवातील वाड्या वस्तीवरील रस्त्यांची दुरावस्था.
गणेशगांव प्रतिनिधी : नूरजहाँ शेख
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील निरा नदीच्या काठावरती वसलेले हे गणेशगांव या गावातील रस्त्यांची ही जीवघेणी अवस्था लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे झाली आहे.
गणेशगांव-शेंडगे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची हि दुरावस्था असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.या वस्तीवरती ४५० ते ५०० लोक रहात आहेत.गेले कित्येक वर्षे या रस्त्याचे काम न केल्यामुळे त्याचा त्रास शाळेच्या मुलांना,वयोवृद्ध नागरिकांना,शेत मजुरांना होत आहे.पावसाळ्यात मुले शाळेत जाताना पाय घसरून चिखलमय डबक्यात पडतात आणी वह्या पुस्तकांचा झालेला चिखल घरी घेऊन येतात तर काही मुले शाळेत जायलाच नको म्हणून अडून बसतात. वस्तीवरील एखाद्या सिरीयस पेशंटला दवाखान्यात घेऊन जाताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते पेशन्ट बरोबर जाणाऱ्या लोकांनाही या रस्त्याने ये जा करताना पाय घसरून पडून आपन ही पेशन्ट होऊ याची भीती उरात बाळगून एक एक पाऊल पुढे टाकावे लागते.या आधुनिक युगात या गावात वस्तीवर जाण्यासाठी बैलगाडी हा एकमेव वाहतूक पर्याय निवडावा लागतो त्याचे ही चाक चिखलात ऋतून बसण्याची भीती असते.
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल बाजारात विक्रीसाठी बैलगाडीनेच ने आण करावी लागते.मोठी वहाने चिखलात अडकून पडतात त्यामुळे मोठी वाहने या रस्त्यावर येत नाहीत.त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.त्यामुळे तेथील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अकलूज-टेंभुर्णी रस्त्या नजीक हे गाव आहे.या भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून या गावाला निरा नदीचे पाणी बंधाऱ्याने अडविले आहे परंतु बंधाऱ्याची सर्व दारे कुजलेली छिद्रे पडलेल्या आवस्थेत आहेत.शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी निसटून जात आहे.लोकप्रतिनिधींचे. याकडेही दुर्लक्ष दिसून येत आहे.गावातून कॅनालचा पाट वहात असल्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम आहे.पण रस्त्येच नसल्यामुळे या गावाचा विकास खुंटला आहे.वेळोवेळी या भागातील शेतकरी वर्गाने रस्त्याची मागणी करून ही ह्या रस्त्याचे काम होत नाहीत , कॅनॉल पट्टी रस्त्याची ही हिच दुरावस्था झालेली आहे.तरी लोक प्रतिनिधीनी या गावातील समस्याकडे लक्ष घालून लवकरच चांगला रस्ता बनवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा