*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
*गेल्या 10 वर्षात देशातील एकूण बँकांमध्ये सर्वात मोठा 1 लाख 71 हजार 774 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा 2019 मध्ये झाल्याची* *धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घोटाळ्यातील केवळ 9 टक्के रक्कम बॅंकांमध्ये परत आली. विशेष म्हणजे याच वर्षात देशात लोकसभा निवडणूक झाली.* *त्यामुळे या घोटाळ्यातील 1 लाख 55 हजार 819 कोटी रुपये निवडणुकीत तर वापरले नाही*, *असा प्रश्न उपस्थित झाला आहे*.
*बँकांमधील घोटाळे*, *अनियमितता, अफरातफर आता नवीन नाही. परंतु या घोटाळ्याचे आकडे अनेकांच्या भुवया उंचावणारे आहेत. गेल्या दहा वर्षात, अर्थात 2013-14 ते 2022-23 या काळात देशातील एकूण बॅंकांंमध्ये 5 लाख 32 हजार 181 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नोंद केली आहे*. *आरबीआयने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून घोटाळ्यांच्या आकडेवारीने सरकार, बॅंकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घोटाळ्यांतील रकमेच्या आकडेवारीसोबतच घोटाळ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे घोटाळेबाजांवर काहीच कारवाई होत नसल्याने घोटाळ्यांची संख्याही वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे*. *गेल्या दहा वर्षांत देशातील विविध बॅंकांमध्ये 69 हजार 707 घोटाळे झाले आहेत. 2013-14 या वर्षात 4 हजार 295 घोटाळे झाले असून घोटाळ्याची रक्कम 9 हजार 986 कोटी होती. पुढील 2014-15 या वर्षात 4 हजार 631 घोटाळे झाले असून घोटाळ्यातील रक्कम 19 हजार 13 कोटी रुपये एवढी होती. 2013-14 च्या तुलनेत 2014-15 मध्ये दुप्पट रकमेचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच वर्षात लोकसभा निवडणूक झाली होती* *त्यानंतर सातत्याने घोटाळ्यांची संख्या व रक्कम वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. 2019-20 या वर्षात 8 हजार 588 घोटाळे झाले. यात 1 लाख 71 हजार 774 कोटींच्या रकमेचा समावेश आहे*.
*रकमेचा विचार केल्यास गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा घोटाळा याच वर्षात झाला*. *याच वर्षात देशात लोकसभा निवडणूकही झाली. या घोटाळ्यातील काही रक्कम बँकांनी वसुलीही केली*. *परंतु ही टक्केवारी केवळ 9 आहे. बॅंकांनी घोटाळ्याच्या एकूण रकमेपैकी केवळ 15 हजार 955 कोटी वसूल केले. अर्थात 1 लाख 55 हजार 819 कोटी रुपये बॅंकांना परत मिळाले नाहीत. ही रक्कम निवडणुकीत तर खर्च केले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे*.
*सौजन्य*
* *माहिती सेवा ग्रुप--- पेठ वडगाव*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा