Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

लवंग( 25/4) येथील" फिनिक्स इंग्लिश स्कूल "मध्ये "महात्मा ज्योतिबा फुले "यांच्या स्मृतिदिनी चिमुकल्यांनी केले विनम्र अभिवादन.

 


*अकलूज----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

                             फिनिक्स इंग्लिश स्कूल (२५/४) लवंग येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त चिमुकल्यांनी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून म.फुले यांची पुण्यदिन साजरा करण्यात आला.



           या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रामदादा चव्हाण,लक्ष्मीताई भोळे,महादेव कोळेकर यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,महापुरुष हे कोणत्या एका जातीचे किंवा धर्माचे नसतात तर ते संपुर्ण समाजाचे असतात. पुर्वीच्या काळी मुली शिक्षणापासून खूप लांब होत्या.महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आज त्यांच्यामुळेच आजची स्री शिकली सुशिक्षित झाली व स्वतःच्या पायावर उभी राहून ती स्वावलंबी बनली आहे.याचे संपुर्ण श्रेय फुले यांना जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा