ज्येष्ठ -पञकार--संजय लोहकरे.
टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी आणि परिसरात बिबट्याच्या दहशतीने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून वनविभाग मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक वन विभागावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
तांदुळवाडी आणि परिसरात दररोज नवनवीन घटना बिबट्याच्या संदर्भात ऐकावयास मिळत आहेत.कधी इकडे दिसला तर कधी तिकडे दिसला अशी परिस्थिती असताना लोकांना संध्याकाळचे,रात्रीचे फिरणे मुश्किल झाले आहे.यामुळे शेती व्यवसायावर परिणाम पडताना दिसत आहे.दिवसाच सगळी कामे उरकावी लागत आहेत.बिबट्या आहे की तरस आहे याबाबत सांशकता असली तरी या हिंस्त्रक प्राण्याने नागरिकांचे जीवन जगणे मुश्किल करून टाकले आहे.या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांना माहिती दिली असली तरी ते मात्र याबाबतीत सतर्कता दाखवताना दिसत नाहीत.वन विभागाला माहिती दिली की,हो आमचे लक्ष आहे,तुम्ही घाबरू नका एवढेच त्यांच्याकडून उत्तर येते.पण ठोस पाऊल मात्र वन विभागाकडून कोणतेच उचलले जाताना दिसत नाही त्यामुळे लोकांमध्ये घबराहट तर आहेच पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.याअधिकाऱ्यांविरोधात आंदोलन देखील करण्याच्या तयारीत अनेक नागरिक दिसत आहेत.
अनेकांच्या शेळ्या वगैरे फस्त करताना हा हिंस्त्रक प्राणी दिसत आहे पण वनविभाग मात्र यावर हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत पाहायला मिळत आहे.वाड्या वस्त्यावर तर या बिबट्याची दहशत निर्माण झाली असून यावर लवकरात लवकर उपाय शोधावा अन्यथा वन विभागाच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले जाईल अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा