ज्येष्ठ -पञकार--संजय लोहकरे.
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे जनतेची आर्थिक पिळवणूक करून ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिकची आर्थिक संपत्ती जमा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अकलूज कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ झाला आहे.
भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, नागनाथ बाबुराव साळुंखे,ॲड.अविनाश टी.काले यांनी राज्य परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे लेखी तक्रारी द्वारे चौकशी करून कारवाई करणेची मागणी केलेली आहे. कारवाईसाठी तक्रारीची प्रत महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांना पाठविली आहे.
सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या अकलूज या ठिकाणी पहिलेच उपोषण असल्याची चर्चा या निमित्ताने सगळीकडे सुरू आहे.
उपोषणकर्त्यांनी राज्य परिवहन आयुक्त मुंबई, महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे रितसर दाखल केलेली आहे.या कारवाईला गती यावी व उपरोक्त खात्यांच्या वरिष्ठ पातळीवरून कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा