Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी स्पर्धेत सर्व गटातून सुमारे 800 मल्ल होणार सहभागी.

 


*अकलूज----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

                           शिवतीर्थ आखाङा शंकरनगर -अकलूज येथे दि.२९,३०नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या वजनगट व त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेत सुमारे आठशे मल्ल सहभागी होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी दिली.या वेळी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होत्या.


       कै. रत्नप्रभादेवी मोहीते-पाटील यांची जन्मशताब्दी, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहीते पाटील व अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहीते-पाटील या बंधुंची अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचाली निमित्त सदरच्या स्पर्धा होत आहेत. 

                सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

     सयाजीराजे मोहिते पाटील पुढे म्हणाले, त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय मल्लांच्या कुस्त्या होणार असून हरियाणाचा मल्ल प्रविण भोला व कोल्हापुर येथील महाराष्ट्र केसरी पृथ्विराज पाटील यांच्यात तर पुणे येथील मल्ल समिर शेख व कंदर येथील मल्ल सतपाल सोनटक्के यांच्यात विशेष कुस्ती होणार आहे. यावेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु व माजी अधिकारी पैलवान कर्तारसिंग हे स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र येथील राष्ट्रीय स्तरावरील मल्ल सहभागी होणार आहेत.

ञिमुर्ती केसरीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस दोन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दिङ लाख, तृतिय एक लाख व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहे. तर वजनी गटासाठी स्वतंत्र बक्षिसे असल्याचेही सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सांगितले.

        तर वजनी गटासाठी २५ ते ८५ असे किलो पर्यंत एकूण १५ गट आहेत. या वजनी गटासाठी सुमारे ७०० मल्ल व त्रिमूर्ती केसरी साठी सुमारे ८० मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असे मंडळाचे संचालक वसंतराव जाधव यांनी सांगितले.

 स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी स्पर्धेसंबंधीच्या जय्यत तयारीचा आढावा घेतला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, बाळासाहेब सावंत, सचिव बिभिशन जाधव उपस्थित होते. दि. २९ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुल्लांनी आपली वजने आखाड्यात देण्याचे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा