इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- भारतीय जनता पार्टी, पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या इंदापूर तालुका संयोजक इंदापूर ग्रामीण पदावर युवराज विलास बोडके पिंपरी बुद्रुक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवराज बोडके यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे अनेक वर्षे पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात, आपला प्रदीर्घ अनुभव पाहता आपण जनतेच्या प्रगती व कल्याणाकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध जन कल्याणकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकाऱ्यांन सोबत अथक परिश्रम कराल. तसेच ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल.
भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ दत्तात्रेय कणसे, प्रदेश सचिव माऊली वाघमोडे यांच्या हस्ते युवराज बोडके यांची भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सुरेश बापू बोडके, अमोल बोडके बावडा लाखेवाडी गट संयोजक जोतीराम कुर्डे, अण्णा पाटील, प्रभारी बारामती लोकसभा मतदारसंघ वैजनाथ हंगे, समीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा