इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- बावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर रणजीत अशोकराव घोगरे यांची निवडीबद्दल गणेशवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
बावडा ग्रामपंचायत ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये काळेश्वर ग्रामविकास पॅनलचे १२ सदस्य विजयी झाले. तर जनतेतून सरपंच पदी सौ पल्लवी रणजीत गिरमे या विजयी झाले आहेत. तसेच वार्ड क्रमांक सहा मधून विजयी झालेले रणजीत अशोकराव घोगरे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
गणेशवाडी ग्रामस्थांच्या वतीने नूतन उपसरपंच रणजीत अशोकराव घोगरे यांचा आबासो तावरे व शिवाजी घोगरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून विठ्ठल शिवाजी घोगरे, सुधाकर दत्तात्रय कांबळे, सौ सुप्रिया अखिल कांबळे या विजयी झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, बाळू आण्णा घोगरे, सोसायटीचे उपाध्यक्ष नामदेव घोगरे, आबासो तावरे, कांतीलाल घोगरे, सिध्देश्वर तावरे, जालिंदर घोगरे, अखिल कांबळे, सयाजी घोगरे, श्रेयस बागल, संजय घोगरे, तुकाराम घोगरे, सुधाकर घोगरे, विजय तावरे, दत्तात्रय घोगरे, लियाकत तांबोळी, मुजाहिद तांबोळी आदि उपस्थित होते.
आगामी कार्यकाळात रस्ते, गटार बरोबरच स्वच्छता, साफसफाई करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे सत्कारास उत्तर देताना नुतन उपसरपंच रणजीत घोगरे यांनी सांगितले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा