*संपादक---- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
*मथळा वाचून काहींना धक्का बसला असेल परंतु जे दरम्यानच्या काळात अजमेर शरीफ जाऊन आलेत त्यांना हा अनुभव नक्कीच आला असेल. मित्रांनो आपल्या मुद्द्याचं बोलू डिजिटल* *चॅनेलसाठी राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यात निवडणुकांचं कल जाणून घेण्यासाठी नुकतंच जाऊन आलो. आमच्या मार्गावर अजमेर शरीफ होतं*, *मग हिंद के वली ख्वाजा मोईनोद्दीन चिशती यांच्या मजारचं दर्शन घेण्याचं ठरवलं. सकाळी 11 वाजता आम्ही हॉटेलवरून आवरून दर्गा परिसरात पोहचलो. देशभरातून सर्व समाजाचे भाविक तेथे आले होते*. *दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर काही टोपी धारक लोक हातात चप्पल घेऊन आतमध्ये यायला सांगत होते. सुरवातीला ते लोक तेथील स्वयंसेवक वाटले. चांगलं काम करतायेत म्हणून मी आणि मित्रांनी हातात चप्पल घेत आत प्रवेश केला*.
*त्या स्वयंसेवकांपैकी एकजण आमच्याकडे आत आला* *आणि डाव्या साईडला असणाऱ्या फुल आणि चादरच्या दुकानाजवळ घेऊन गेला आणि चपला या पोत्यात ठेवा म्हणला*. *अरे वाह! हा माणूस किती चांगलं काम करतो, असं त्यावेळी वाटलं*. *पण पुढच्या क्षणी त्याने आम्हाला या इथून फुल आणि चादर घ्या, कितीची देऊ 501 की 1001 ची*? *त्याने असा प्रश्न करताच माझ्या डोक्यात ट्यूब पेटली*. *ही त्याची मार्केटिंग स्टेटर्जी आहे हे समजून मी त्याला प्रतिसाद न देता पुढे गेलो. इथपर्यंत काही वाटलं नाही*, *कारण इथे तो व्यवसाय करत होता. थोडं पुढं गेल्यास, डाव्या साईडला लांब काळी टोपी*, *कडक लिलनचा पठाणी, पठाणीवर तितकाच महागडा नेहरू जॅकेट*, *असे ड्रेस परिधान करून लाइनिंने उभारलेले काही लोक होते. हे लोक पुणे-मुंबई ट्रॅव्हल्स एजंटप्रमाणे भाविकांना बोलवत होते. काही लोक आत मजारपर्यंत नेतो, दर्शन घडवतो, चला म्हणून अडवत होते*.
*या टोपीधारक दलालांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही मुख्य दर्ग्याच्याजवळ पोहचलो. तिथे भलीमोठी लाईन लागली होती.* *आत सोडणाऱ्या एकाने मला टोपी घातल्याशिवाय आत प्रवेश नाही*, *असं सांगून तिथेच असणाऱ्या टोपी-रुमालचं दुकान दाखवलं. 4 दुकाणांपैकी एका पर्टीक्युलर दुकानातचं जा म्हणून त्याने मला सांगितलं.* *रुमाल घेऊन मी तिथे येताच एका खादिमने माझा हात घट्ट धरत ओढत नेलं. मी त्याला कुठे नेतोय असं विचारत होतो. पण तो काही ऐकत नव्हता*. *लाईनमध्ये उभारलेल्या लोकांना बाजूला करत त्याने मला थेट मजारच्या समोर आणून उभं केलं. बाकीच्या आम्हाला बघत होते*. *तोपर्यंत मला त्याची पैशे कमावण्याची युक्ती कळून चुकली होती. तितक्या गर्दीत त्याने मला थेट मजार जवळ उभं करत माझ्या डोक्यावर हिरवा कपडा ठेवला आणि जोरजोरात दुआ मागू लागला*. *दुआ मागत असताना तो मजारच्या चारीबाजूने असलेल्या लोखंडी ब्यारेकेट्समध्ये उभा असलेल्या त्याच्या साथीदारांकडे बघून हसत होता, हे मला कपड्यातून दिसत होतं*.
*कसला बकरा गटवला असं त्या हसण्यातून दिसत होतं. मीपण खाली मान घालून हसत होतो. कारण मी त्याला बळी पडणार नव्हतो*. **दुआ संपताच मी गर्दीतून वाट काढत बाजूला निघायचा प्रयत्न केला तर त्याने मला अडवलं आणि नजरानाच्या रुपात पैशांची मागणी केली*. *मी त्याला माझ्याकडे पैसे नाहीत, असं सांगितलं*, *तो म्हणाला गुगल पे, फोन पेवर असतील बघा, मी स्कॅनर देतो. मी म्हणालो माझ्याकडे काहीच नाही. रागाने माझ्याकडे तो बघत होता*, *मी त्याला म्हणालो मी तुम्हाला मला आत ने असं सांगितलेलं नव्हतं, मग कसले आले पैसे. असं म्हणत* *मी मजारच्या दुसऱ्या बाजूने चालत असताना मजारजवळ असलेल्या लोखंडी भिंतीतून एकाने मला थांबवलं आणि डोक्यावर मोराचे पिसे मारत दुआ करू लागला*. *दुआ संपताच त्याने लोखंडी जाळीतून पैशासाठी हात बाहेर काढला*. *चार पाचशे रुपये नजराना द्या म्हणून पुढे हात केला. सेम त्यालाही मी पैसे नाहीत म्हणून बाजूला आलो तर तो खवळला*,*मी म्हणालो मजारच्या जवळच तुम्ही लोकांनी दलाली सुरू केली का? असं म्हणत मी बाहेर पडलो*.
*नंतर कळालं की फुलांची आणि कपड्यांची असणारी 500, 1000 रुपयांच्या चादर परत त्या दुकानात येतात आणि ते परत भाविकांना विकल्या जातात. दर्ग्याच्या आतल्या परिसरात भली मोठी देग (भांड) आहे*. *त्यात लोक लंगरसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे टाकतात*. *परंतु ज्या दलालाने त्या भाविकांना तिथपर्यंत आणलं त्याला दलाली दिली जाते, असं देखील काहींकडून कळलं. तिथेच असणाऱ्या तारागड येथे तर* *चादर घेतली नाही किंवा पैसे दिले नाहीतर मारहाण देखील केली जाते. एकूणच पाहिलं तर दर्गा परिसर हा दलाल आणि लुटारू लोकांचा अड्डा बनला आहे आणि त्यामुळे यापुढे कोणीही* *अजमेरला गेल्यास त्यांनी अशा दलालांना भीक घालू नये आणि त्यांच्यापासून सावध राहा!*
*मुस्तान मुमताज मुख्तार मिर्झा*
*कळंब ,जि.उस्मानाबाद (धाराशिव)*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा