Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

*अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये डाळिंबाची "221" रुपये विक्रमी दराने विक्री*.

 


अकलुज प्रतिनिधी

 केदार --लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                             *अकलुजच्या शंकरराव मोहिते-पाटील कृषी ऊत्पन्न बाजार समितीची नवी ओळख "डाळींबाची पंढरी "होऊ लागली आहे*.*आज बाजार समितीमध्ये भगव्या डाळींबाला प्रती किलोस २२१/- रूपये भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे*.



            *आज बाजार समितीच्या लिलावामध्ये धनाजी घाडगे यांच्या विठ्ठल फ्रुट कंपनीमध्ये अजित खुळे थोरात रा.खुळेवाडी या शेतक-याच्या भगवा जातीच्या डाळींबास प्रती किलोस २२१/- रूपये ऐवढा विक्रमी दर मिळाला आहे.सध्या बाजारात मंदीचे दिवस चालू असताना हा मिळालेला दर चांगला आहे*.*डाळींब व्यापारी खडु नाना तथा मनोज जाधव यांच्या एम.जे.(MJ) कंपनीने हा माल खरेदी केला.आपला माल अकलूज कृषी उत्पन्न बाजार कमिटीकडे डाळींब विक्रीला आणण्याकडे शेतक-यांची पसंती आहे*.



        *याप्रसंगी डाळींब व्यापारी खंडु नाना( मनोज)जाधव,नागेश केदार,सादिक बागवान,राजुभाई बागवान,सरपंच रावसाहेब भोसले व बहुसंख्य सांगोला,पंढरपुर, करकंब व अकलुज परिसरातील व्यापारी हजर होते*.*समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे मोलाचे सहकार्य व यशस्वी मार्गदर्शन सचिव राजेंद्र काकडे व सावंत यांचे नियोजन,मोलाचे सहाय्य व कार्य कुशल कर्मचारी वर्ग यांचेमुळे* *अकलुज ही ऊस क्षेत्राबरोबरच"डाळींबाची पंढरी" म्हणुन नावारुपाला आली असुन तालुक्यात डाळींब क्षेत्र लागवडीस शेतक-यांचा कल वाढला आहे*.*यावेळी सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी शेतक-यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा