टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज
*पॅलेस्टाईन..!अरबराष्ट्रांचा गांडुळपणा..!अमानुषपणे नरसंहार...जगाचे क्रूरकर्मा समोर लोटांगण..मानवता मेल्यात जमा!!तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर?*
*जगाच्या नकाश्यावरील पॅलेस्टाईन नावाच्या एका असह्य देशाचा गाझा पट्टीत अमानुषपणे नरसंहार होतांना जग पाहतोय...!! तब्बल बारा हजार निष्पाप नागरिकांना अक्षरश अत्याधुनिक हत्यारांच्या बॉम्ब वर्षाव करत सार्वजनिक कत्तल केलीय जात आहे.....!!त्यातही तब्बल पाच हजार कोवळ्या मुलांना मारण्यात आले....दहा मिनिटाच्या अंतराने एका आईच्या कुशीत निष्पाप मुलाचा निरंकुशपणे मृत्यू होत आहेत..!!दवाखान्यात उपचार घेणाऱ्या जन्म घेणाऱ्या कोवळ्यांना तडफडून मरणाला सामोरे जावे लागत आहे....तेवीस लाखांचा प्रदेशातील हजारो इमारतींच्या वस्त्या भुईसपाट केल्या गेल्या... जात आहे.दवाखान्यातील जखमींना उपचार नाही...!!जिवंत माणसांना खायला अन्न नाही....रहायला आसरा नाही....सैरावैरा पळत ही जिवंत.... अर्ध मेलेली कधीतरी मृत्यूच्या दारावर उभी असलेली मानव जात....सर्वत्र अंधकारच अंधकार....आणि हा नरसंहार खेळ निरंकुशपणे गेल्या पंचेचाळीस दिवस सुरू आहेत....मानवतेच्या बोंबा आणि फक्त बोंब मारणाऱ्या जगाच्या ह्रदयाला अजूनही पाजर फुटलेले नाही....हे तर सोडा.....जगातील मुस्लिम देशांवर अधिराज्य गाजविण्याच्या टिमग्या मारणारे भेदरलेले डरपोक अरबराष्ट्रे शेपूट गुंडाळून बसले आहेत.क्रूरकर्माचा निरंकुश क्रूरपणा सुरूच आहे...जग तमाशा पाहतोय....कारण....हा तमाशा एखाद्याच्या दारावर होत नाही....!*
*इराक,अफगाणिस्तान,सीरिया*,*लेबनॉन*व येमेन आणि नुकतेच युक्रेन आणि आता गाझा*..... *या देशांच्या नशिबी दडभद्रीपणाच आहे.ज्या पद्धतीने अमेरिकेने खोटारडेपणा करून सद्दाम हुसेन यांना पायउतार केला....फाशी दिली.....तोच खेळ या राष्ट्रांनी भूगतलेत.....पश्चिमात्यांच्या अहंकार या देशांना मारक ठरला.रशियाने सीरिया असो किंवा युक्रेन अमेरिके पुढे नांगी टाकली नाही.हमासच्या एका क्रूर हल्ल्या मुळे हे सर्व घडत असलं तरी सामान्यांना सार्वजनिकरित्या हमास समजून नरसंहार करणे ही काही पुण्याई नाहीच....हा तर निरंकुश इस्रायल व त्याचा नेता नेतन्याहुचा नामर्दपणा....!!गाझा मधील आजचे चित्र जगातील मानवता संपल्यात जमा आहे.* *सुरुवातीच्या दोन दिवसात तीस लाख नागरिकांना गाझा सोडण्याचा फर्मान जारी करून लोकांना किती* *निरंकुशपणाचा अमानवीयतेला समोर जावे लागेल..*.ही जण झालेली होती.ज्यांनी घरे सोडली नाहीत ते तर सोडा ज्या सेफ झोन दक्षिणेत शरण घेण्याचा इशारा दिला त्या पट्ट्यात ही हल्ले करून हरामीपण क्रूरकर्माने दाखविले*.
*आज संपूर्ण गाझा इस्रायलच्या ताब्यात आल्यात जमा आहे*. *औषधींचा,तेल,खाद्य-सामग्री,पिण्याचे पाणीवर नियंत्रण लावल्याने आज लाखो लोक तडफडत आहे.गाझा च्या सर्वात मोठा अल-शिफा इस्पितळ इस्रायलने ताब्यात घेतल्याने उपचार तर सोडा रुग्णांना पिटाळण्यात येत असल्याचा बातम्या येत आहे.शेकडो डॉक्टर्स नर्स मारले गेलेत.इस्पितळ,शाळा, हॉटेल्सवर बॉंब हल्ले करून लोकांना निराधार करण्यात आले.गाझा मध्ये पिणे,स्वयंपाक,सफाई,या साठी दरडोई तीन लिटर पेक्षा कमी पाणी मिळत आहेत.हमासच्या बोगद्यात सामान्य लोकांना राहण्यास परवानगी नाहीत...योनोच्या शेलटरच सुरक्षित आहेत.त्या मुळे लाखो लोक आज याच शेलटर मध्ये आहेत.क्रूरकर्माच्या विमान हल्ल्यांनी तब्बल तेवीस हजार इमारती,१९ हॉटेल्स ९० शाळा,७०कारखाने व १९ इस्पितळ बेचिराख झालेत.*
*या युध्दच्या पर्शवभूमीवर मुस्लिम जगतातील शिया-सुन्नी वाद पुन्हा उफाळून आला.इस्रायलला कडक शब्दात खडे बोल सूनवणाऱ्यात इराण आजही आघाडीवर आहे,त्याला जॉर्डन,लेबनॉनच्या हिजबुल्लाहने समर्थन दिलंय, मात्र सौदी व अरब अमिराती,इजिप्त सारख्या राष्ट्रांनी वक्तव्यांच्या मैफिली जमवली.आपला गांडुळपणा दाखवलं.ही राष्ट्रे भेदरलीत... कारण त्यांना आपल्या गाद्याची चिंता आहे. विशेष करून आपला बाप अमेरिकेला नाराज करून दृढतेने पुढे जाणार नाहीत....बोलणार नाहीत.आवाज काढला तर चिमटा, अपार संपत्ती असून ही ऐश्वर्यावर भर देणारी हिजळी मंडळी....!!* *ताठ मानेने उभे राहिलो तर आपल्या गादी खाली सुरंग लागण्याची भीती*...!!
*शेवटचे.…...युनोच्या बैठकीत सार्वजनिक शिक्षेचा जगभर निषेध होत आहे.गाझातील प्रत्येक नागरिक हमास नाहीत म्हणून इस्राईलवर युद्धबंदीचा दबाव आणला जात आहे.कतारने पहिल्या टप्प्यात पन्नास ओलिसांना सोडण्याचा व युद्धबंदीचा फारमुला इस्रायलला सोपविला आहे.या क्रूरपणावर लवकरच जगाने तोडगा काढला नाही तर याचे दूरगामी परिणाम भयंकर असेल.इराण-हिजबुल्लाहने युद्धात थोडी सुद्धा आग ओतली तर अरब राष्ट्रातील जनताच आपल्या शाही सत्तांना उलथवून टाकेल....मग जो आगडोंब होईल....जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठयावर येऊन ठेपेल....आताच ते शक्य नसेल तरी अर्धे जग बेचिराख होईल.....याला इस्त्रायल नावाचा क्रूरकर्मा जबाबदार असेल... तो पर्यंत अहंकाराची बत्ती गुल झाल्या शिवाय राहणार नाही... शेवटी सत्ता...ताकद, सत्तेची मस्ती...गुरूर जास्त दिवस चालत नाही...(जयहिंद)!!!*
*अशफाक शेख,वरिष्ठ पत्रकार,सहारा समय, औरंगाबाद*..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा