Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

तामलवाडी ता. तुळजापूर येथील औद्योगिक वसाहत मधील भरण्यात येणाऱ्या "करा" संदर्भात उपोषणाचा इशारा

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                            तुळजापूर तालुक्यातील मोजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतने तेथील औद्योगिक वसहतींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नावाजलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या करा संदर्भातील कागदपत्राची माहिती द्यावी याकरिता राष्ट्रवादीचे तुळजापूर विधानसभा प्रभारी अध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी यापूर्वीच २४ ऑगस्ट २०२३ रोजी लाक्षणिक उपोषण केले गेले होते त्यावेळी त्यांच्या निवेदनात त्यांनी असे नमूद केले होते की, तामलवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राअंतर्गत शासकीय नियमावली प्रमाणे कमीत कमी दराने जवळपास सव्वा कोटी कर आकारणी करून संकलन केले जाऊ शकते भविष्यात या निधीचा वापर गावातील पायाभूत सुविधा जसे सिमेंट रस्ते बनवणे, पाणीपुरवठा सुव्यवस्थित करणे, आरोग्य उपकरण उपलब्ध करणे, जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा बनविण्याकरिता साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन तसेच ज्या इतर मूलभूत सोयी सुविधांचा अभाव सर्वसामान्य जनतेकरता गावात आहे त्या पूर्ण करण्यासाठी औद्योगिक वसाहत करिता करवाढ करून वसुली करणे आवश्यक आहे त्या आंदोलनादौरान प्रशासनामार्फत श्री सावंत यांनी मागणी केलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीद्वारे कालावधी किंव्हा वेळ मागण्यात आला होता व लेखी स्वरूपात आश्वासन विस्तार अधिकारी (पंचायत) ए.सी.कावळे, ग्रामसेवक चैतन्य गोरे व सरपंच नूरबानू सिकंदर बेगडे यांच्या मध्यस्थीने देऊन उपोषण स्थगित करण्यात आले होते प्रशासनाने उपोषणकर्त्यांकडून मागणी केलेली मुदत संपल्यानंतर उपोषणकर्ते श्री सावंत यांनी सरपंच सौ नूरबानू सिकंदर बेगडे यांना ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कंपनीच्या कागदपत्रांची मागणी केली त्यावेळी सौ बेगडे यांनी उपोषण करताना कळवले की, आजच्या तारखेस ग्रामसेवक व ग्रामपंचायत लिपिक यांच्याकडे मी चर्चा केली त्यावेळी खालील कंपन्यांचे कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी येथे उपलब्ध नाहीत किंवा कंपन्यांनी सादर केलेले नाहीत










 त्यासंदर्भात त्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे बालाजी अमाईन्स लिमिटेड, व्यंकटेश्वरा सिमेंट प्रोडक्ट, व्यंकटेश्वर प्लास्टिक इंडस्ट्रीज, पद्मावती इंडस्ट्रीज, कटारे स्पिनिग मिल लि कमलानगर, कटारे सौरऊर्जा प्लांट, गोरज गॅस इंडस्ट्रीज, विश्व इंडस्ट्रीज, महानंदी पाईप इंडस्ट्रीज, साई प्लास्टिक इंडस्ट्रीज, महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज,साई स्पन इंडस्ट्रीज, किसान इरिगेशन इंडस्ट्रीज, विक्रांत प्लास्टिक इंडस्ट्रीज, मेगा संजय पतंगे इंडस्ट्रीज, तुषार विलास पतंगे इंडस्ट्रीज, महालक्ष्मी इंडस्ट्रीज, साई इंडस्ट्रीज, मराठवाडा इंडस्ट्रीज, मोरया स्टोन क्रेशर, रामलाल बाबुराव विटकर स्टोन क्रेशर, दयानंद चंद्रकांत मंठाळकर स्टोन क्रेशर व विमल पेपर मिल इत्यादी, जर त्यासंदर्भात जर उपोषणकर्त्यांनी निवेदन सादर केल्याप्रमाणे ३० नोव्हेंबर २०२३ नंतर दुसऱ्यांदा उपोषण सुरू केल्यास त्या कागदपत्रासाठी मी म्हणजे सरपंच ग्रामपंचायत तामलवाडी स्वतः इंडस्ट्रीज असोसिएशन तामलवाडी चे अध्यक्ष श्री राजेश्वर रेड्डी यांची कंपनी बालाजी अमाईन्स लिमिटेड यांच्या कंपनीसमोर ग्रामपंचायत सदस्यसह चर्चा करून उपोषणास बसेन याव्यतिरिक्त त्यासंदर्भात मी जिल्हाधिकारीसाहेब धाराशिव, मुख्यकार्यकारीसाहेब जिल्हा परिषद धाराशिव व गटविकास अधिकारीसाहेब तुळजापूर यांनाही त्यासंदर्भात लेखी स्वरुपात कल्पना देईन त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचे असेल तसेच हा विषय सरपंच संघटनेमार्फत मा. मुख्यमंत्र्यापर्यंत नेणार असल्याचे कळवले आहे वरील सर्व विषयाबाबत आमच्या प्रतिनिधींनी ग्रामसेवक याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्याचबरोबर तामलवाडी परिसरातील लोकांमध्ये वरील विषयाशी भावना तीव्र झालेल्या असून चर्चेस उधान आले आहे की, उपोषणकर्ते यांनी मागणी केलेल्या कागदपत्रासंदर्भाचा संबंध कर चुकवेगिरी, औद्योगीक करवाढीशी, विनापरवाने उत्पादन निर्मिती करण्याशी आहे त्यामुळे सरपंच सौ नुरबानू सिकंदर बेगडे यांचे पती मागील १८ वर्षापूर्वी पासून इंडस्ट्रीज असोसिएशन तामलवाडी चे अध्यक्ष यांच्या बालाजी आमाईन्स लिमिटेड कंपनीमध्ये कामास असून वरील करवाढ रद्द करण्यासाठी त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांची बदली तामलवाडी येथून हैदराबाद येथील राजेश्वर रेड्डीच्या दुसऱ्या कंपनी येथे अचानक विना नोटीसीद्वारे तत्काळ करण्यात आली आहे, त्यांना व्यक्तिगत रित्या त्रास किंवा सूड भावनेने वागणूक देण्यात येत आहे किंवा त्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की जर गावच्या सरपंचाला इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी सूडभावनेतून कारवाई करत आहेत तर त्यांच्या कंपनी पाठीमागे कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाच्या तलावात केमिकल मिश्रित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा तामलवाडी येथील माणसे आणि जनावरे यांच्याकरिता निर्माण झाला आहे असे शासकीय लॅबोरेटरीद्वारे झालेल्या पाणी परीक्षणात निष्पन्न झाले आहे व सद्या दुष्काळ सद्रश्य परिस्थितीत पाणी पिण्याकरीता उपलब्ध असूनही पिण्यालायक नाही त्यामुळे तामलवाडी परिसरातील लोक व जनावरे वणवन भटकत असताना दिसत आहे व खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे ते रोखण्यासाठी या दोन्ही संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात यावी तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंज, वाणिज्य व व्यवसाय मंत्रालयास कर चुकवेगिरी संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयामार्फत लेखी स्वरुपात तक्रार देण्यात यावी व मुंबई येथे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषद घेऊन हा विषय सार्वजनिक रित्या काम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एन.जी.ओ. यांना कळवण्यात यावे अशी मागणी केली जात आहे याकडे सर्व परिसरातील लोकाचे लक्ष वेधून गेले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा