Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

*जनतेच्या कररुपी पैशातून शासकीय जाहिराती मध्ये राजकीय नेत्यांच्या फोटोस बंदी घालणे काळाची गरज.--ॲड.शीतल चव्हाण.*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज*.

                               *महामानवांच्या प्रतिमा असलेल्या बॅनर्सवर आणि जनतेच्या पैशांतून राबवल्या जात असलेल्या शासकीय योजनांच्या जाहीरातीच्या बॅनर्सवर नेत्यांचे फोटो लावण्याला बंदी घालणारा कायदा आणणे आवश्यक आहे. महामानवांच्या प्रतिमा आणि जनतेकडून कररुपाने जमवलेल्या पैशांतून आखल्या जात असलेल्या योजना यांचा वापर नेत्यांच्या राजकीय स्वार्थासाठी होणे टाळायचे असेल तर असा कायदा आणणे गरजेचे आहे. नेत्यांच्या फोटोंऐवजी अशा बॅनर्सवर महामानवांचा विचार स्पष्ट करणारा मजकूर आणि शासकीय योजनांची थोडक्यात माहिती देणारा मजकूर छापता येईल. ही मागणी सर्वांनी सातत्याने लावून धरल्याशिवाय असा कायदा होणार नाही.*


 *ॲड. शीतल शामराव चव्हाण* 

*(मो. 9921657346)*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा